लूक 13:34-35
लूक 13:34-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती! पाहा, तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे. मी तुम्हांला सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.”
लूक 13:34-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यरूशलेमे, यरूशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे कितीतरी वेळा तुम्हा लोकांस एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती. “पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हास सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो’ असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”
लूक 13:34-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती. आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे. मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने येणारे धन्यवादित असो’ असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.”
लूक 13:34-35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्या व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगड मारणाऱ्या नगरी! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्रित करते तसे तुझ्या मुलांबाळांना एकत्रित करण्याची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तू मला तसे करू दिले नाहीस! पाहा, तुमच्या प्रार्थनास्थळाची उपेक्षा होईल. मी तुम्हांला सांगतो, ‘प्रभूच्या नावाने येणारा तो धन्य!’, असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.”