लूक 13:10-13
लूक 13:10-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता. तेथे एक स्त्री होती, तिला दुष्ट आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस.” नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली.
लूक 13:10-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एकदा शब्बाथ दिवशी येशू एका सभागृहामध्ये शिक्षण देत होते, तिथे एका स्त्रीला दुरात्म्याने अठरा वर्षे अपंग करून ठेवले होते. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूंनी तिला आपल्याजवळ बोलाविले, आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” त्यांनी तिला स्पर्श केला आणि तत्काळ तिला सरळ उभे राहता आले. तेव्हा ती परमेश्वराची स्तुती करू लागली.
लूक 13:10-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो शब्बाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेव्हा पाहा, अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती; ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली.
लूक 13:10-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू साबाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेथे अठरा वर्षे दुष्ट आत्म्याने पीडलेली एक स्त्री होती. ती कुबडी असल्यामुळे तिला सरळ उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून जवळ बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या पीडेपासून मुक्त झाली आहेस.” त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णन करू लागली.