लूक 12:4-8
लूक 12:4-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात, पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा; हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात. मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील
लूक 12:4-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हास सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नका, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सांगतो. तुम्हास ठार मारल्या यानंतर तुम्हास नरकात टाकून देण्यास ज्याला अधिकार आहे, त्याची भीती धरा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा. पाच चिमण्या दोन नाण्यांना विकतात की नाही? तरी त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही. पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मूल्य जास्त आहे. जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या प्रत्येक मनुष्यास देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील.
लूक 12:4-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“माझ्या मित्रांनो, जे शरीराचा नाश करतात व त्यानंतर काही करण्यास समर्थ नाहीत अशांची भीती बाळगू नका. कोणाचे भय बाळगावे, हे मी तुम्हाला सांगतो: शरीराचा वध केल्यानंतर, नरकात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा होय, मी सांगतो त्याचीच भीती बाळगा. पाच चिमण्या दोन नाण्यांस विकतात की नाही? तरी परमेश्वराला एकाही चिमणीचा विसर पडत नाही. खरोखर, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. म्हणून भीती बाळगू नका; कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात. “मी तुम्हाला सांगतो, की जर कोणी मला इतरांपुढे जाहीरपणे स्वीकारेल, तर मानवपुत्र सुद्धा देवदूतांसमक्ष जाहीरपणे तुमचा स्वीकार करीन.
लूक 12:4-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी, हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो:वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याची भीती बाळगा. पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहात! मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो, त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील.