लूक 12:22-26
लूक 12:22-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “म्हणून मी तुम्हांला सांगतो, आपण काय खावे अशी आपल्या जिवाची, अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराची चिंता करत बसू नका. कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. कावळ्यांचा विचार करा; ते पेरत नाहीत व कापणीही करत नाहीत; त्यांना कणगी नाही व कोठारही नाही; तरी देव त्यांचे पोषण करतो; पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात! तसेच चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? म्हणून अति लहान गोष्टदेखील जर तुमच्याने होत नाही तर इतर गोष्टींविषयी का चिंता करत बसता?
लूक 12:22-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “म्हणून मी तुम्हास सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका. कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर महत्त्वाचे आहे. कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात! चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास कोण समर्थ आहे? ज्याअर्थी तुम्हीही सर्वात लहान गोष्ट करू शकत नाही, तर इतर गोष्टींविषयीची चिंता का करता?
लूक 12:22-26 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा येशू त्यांच्या शिष्यांना म्हणाले: “मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय खावे अशी तुमच्या जिवाबद्दल किंवा तुम्ही काय पांघरावे अशी तुमच्या शरीराबद्दल, चिंता करू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्वाचे नाही काय? कावळ्यांचा विचार करा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही, त्यांच्याकडे कोठार वा भांडार नसते, तरीही परमेश्वर त्यांना खाऊ घालतात आणि तुम्ही तर पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक मोलवान आहात! शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय? तुम्ही साध्या गोष्टी देखील करू शकत नाही तर इतर गोष्टीबद्दल काळजी का करता?
लूक 12:22-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, उदरनिर्वाहासाठी ज्या अन्नाची तुम्हांला गरज आहे, त्याची वा शरीरासाठी ज्या कपड्यांची तुम्हांला आवश्यकता आहे, त्यांची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे आहेत. कावळ्यांचे निरीक्षण करा. ते पेरत नाहीत व कापणीही करीत नाहीत, त्यांचा कणगा नसतो व कोठारही नसते, तरी देव त्यांचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात! आणि चिंता करून आपले आयुष्य थोडेफार वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? अशी ही अगदी छोटी गोष्टदेखील जर तुम्हांला जमत नाही, तर इतर गोष्टीविषयी का चिंता करत बसता?