लूक 11:21-22
लूक 11:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने विश्वास ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्यास मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो.
लूक 11:21-22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जोपर्यंत एखादा बळकट मनुष्य, पूर्ण सशस्त्र होऊन आपल्या घराची रखवाली करतो, तोपर्यंत त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. पण एखादा अधिक बलवान येऊन त्याला जिंकतो व ज्या शस्त्रांवर त्याचा भरवसा होता ते काढून त्याची सारी मालमत्ता लुटतो व वाटून देतो.
लूक 11:21-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते; परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो, तेव्हा ज्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो.
लूक 11:21-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सशस्त्र व बलवान मनुष्य त्याच्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. परंतु जेव्हा त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य येऊन त्याच्यावर ह्रा करतो व विजय मिळवतो तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती, ती तो घेतो आणि लूट म्हणून वाटून टाकतो.