YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 1:67-79

लूक 1:67-79 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला आणि त्यानेही भविष्यवाणी केली; तो म्हणाला, “इस्राएलाचा देव प्रभू, ह्याची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आणि लोकांची खंडणी भरून सुटका केली. त्याने आपला सेवक दावीद याच्या घराण्यातून आमच्यासाठी सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे. हे देवाने त्याच्या पवित्र संदेष्ट्यांद्वारे युगाच्या प्रारंभापासून सांगितले होते. जे आमचे शत्रू आहेत व जे आमचा द्वेष करतात त्यांच्यापासून सुटका करण्याचे अभिवचन त्याने आम्हास दिले. आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे व आपल्या पवित्र कराराची आठवण ठेवणार आहे, हा करार एक शपथ होती जी त्याने आमचा पूर्वज अब्राहामाला वाहिली. ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूच्या हातातून सोडवले जाऊन, माझ्यासमोर पवित्रतेने व नीतिमत्त्वाने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन. हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरीता तू त्यांच्यापुढे चालशील. यासाठी की, त्याच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा. देवाच्या दयेमुळे स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल. तिच्याकडून जे अंधारात आहेत व मृत्युच्या छायेत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल.”

सामायिक करा
लूक 1 वाचा

लूक 1:67-79 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर बालकाचा पिता जखर्‍या पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि भविष्यवाणी करू लागला: “प्रभुची स्तुती करा! इस्राएलाचा परमेश्वर यांची स्तुती करा, कारण ते आपल्या लोकांकडे आले आहेत आणि त्यांच्यासाठी खंडणी भरली आहे. त्यांनी आपला सेवक दावीद याच्या घराण्यातून आपल्यासाठी तारणाचे शिंग उभारले आहे. जसे त्यांनी फार पूर्वी आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते, आमच्या शत्रूपासून आणि आमचा द्वेष करणार्‍या सर्वांच्या हातातून त्यांनी आमचा उद्धार केला आहे, आमच्या पूर्वजांवर दया, आणि त्यांच्या पवित्र कराराची आठवण करावी. आणि त्यांनी आमचा पूर्वज अब्राहाम याला शपथ देऊन वचन दिले: आमच्या शत्रूंच्या हातून आमची सुटका करावी, आणि समर्थ होऊन निर्भयतेने त्यांची सेवा करावी, पवित्रपणाने आणि नीतिमत्त्वाने आमचे सर्व दिवस त्यांच्यासमोर घालवावेत. “आणि तू, माझ्या बाळा, तुला परात्पराचा संदेष्टा असे म्हणतील; कारण तू प्रभुच्या पुढे जाऊन त्यांचा मार्ग तयार करशील, त्यांच्या पापांच्या क्षमेद्वारे, त्याच्या लोकांना तारणाचे ज्ञान देशील. कारण परमेश्वराच्या करुणेमुळे, आपल्यावर स्वर्गातून दिव्य प्रभातेचा उदय होण्याची वेळ आली आहे. जे अंधारात जगत आहेत, जे मरणाच्या छायेत आहेत त्यांच्यावर प्रकाश पडावा आणि, आमच्या पायांना शांतीच्या मार्गाचे मार्गदर्शन प्राप्त व्हावे.”

सामायिक करा
लूक 1 वाचा

लूक 1:67-79 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याचा बाप जखर्‍या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा : “इस्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे; आणि आपल्यासाठी त्याने आपला दास ‘दावीद’ ह्याच्या घराण्यात ‘बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे; हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते;’ म्हणजे आपल्या ‘शत्रूंच्या’ व आपला ‘द्वेष करणार्‍या’ सर्वांच्या ‘हातून’ सुटका करावी; अशासाठी की, ‘आपल्या पूर्वजांवर’ त्याने ‘दया’ करावी, आणि त्याने ‘आपला’ पवित्र ‘करार’, म्हणजे जी शपथ आपला पूर्वज ‘अब्राहाम ह्याच्याशी त्याने वाहिली’, ती ‘स्मरावी,’ ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्यासमोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन. आणि हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण ‘प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्यापुढे’ चालशील; ह्यासाठी की, त्याच्या लोकांना त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा. आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे; तिच्या योगे उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल. ‘ह्यासाठी की, त्याने अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा,’ आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावेत.”

सामायिक करा
लूक 1 वाचा

लूक 1:67-79 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

नंतर योहानचे वडील जखऱ्या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा: ‘इस्राएलचा प्रभू परमेश्वर ह्याचा आपण गौरव करू या. त्याने लोकांवर कृपादृष्टी वळवली असून त्याने त्यांचे तारण केले आहे. त्याने आपल्याला त्याचा सेवक दावीद ह्याचा वंशज सामर्थ्यशाली तारणहार म्हणून दिला आहे. त्याने युगाच्या प्रारंभापासून त्याच्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते, ‘आपल्या शत्रूंच्या व आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून तो आपली सुटका करील.’ अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना त्याने दया दाखवली आहे व त्याच्या पवित्र कराराचे स्मरण ठेवले आहे. आपला पूर्वज अब्राहाम ह्याला वाहिलेल्या शपथेनुसार आपल्या शत्रूंच्या हातून आपली सुटका करण्याचे व आयुष्यभर त्याची निर्भयपणे सेवा करण्यासाठी आपल्याला सक्षम करण्याचे वचन त्याने दिले. म्हणजे आपण त्याच्यापुढे जीवनभर पवित्र व नीतिमान असावे आणि हे माझ्या मुला, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरिता तू त्याच्यापुढे चालशील, त्यांना पापांची क्षमा मिळून त्यांचा उद्धार होईल, असे तू परमेश्वराच्या लोकांना सांगशील. अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना त्याने प्रकाश द्यावा आणि आमच्या पायांना शांतीचा मार्ग दाखवावा म्हणून परमेश्वराच्या कोमल करुणेने उद्धाराची पहाट उगवेल.”

सामायिक करा
लूक 1 वाचा