लूक 1:5-6
लूक 1:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यहूदीयाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबीयाच्या वर्गातील जखर्या नावाचा कोणीएक याजक होता; त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलीशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती.
लूक 1:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहूदीया प्रांताचा राजा हेरोद याच्या दिवसात, जखऱ्या नावाचा कोणी याजक होता. तो अबीयाच्या याजक घराण्यातील असून त्याची पत्नी अहरोनाच्या वंशातील होती व तिचे नाव अलीशिबा होते. ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत.
लूक 1:5-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यहूदीयाचा राजा हेरोद याच्या काळात तेथे जखर्या नावाचा एक याजक होता, तो अबीयाच्या याजकवर्गातील होता; त्याची पत्नी अलीशिबा हीसुद्धा अहरोनाच्या वंशाची होती. दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असून प्रभुच्या आज्ञा व नियम पाळण्यात करण्यामध्ये निर्दोष होते.
लूक 1:5-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
यहुदियाचा राजा हेरोद ह्याच्या कारकीर्दीत अबिजाच्या याजकीय संघात जखऱ्या नावाचा एक याजक होता, त्याची पत्नीदेखील अहरोनाच्या याजकीय कुळातील होती. तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात तत्पर होती.