YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 1:46-55

लूक 1:46-55 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मरीया म्हणाली, “माझा जीव प्रभूला थोर मानतो, आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे. कारण त्याने आपल्या दासीची दैन्य अवस्था पाहीली. आतापासून मला सर्व पिढ्या धन्य म्हणतील. कारण जो सर्वसमर्थ आहे त्याने माझ्यासाठी मोठी कामे केली आहेत; आणि त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे त्याने त्याच्या हाताने सामर्थ्याची कार्ये केली आहेत; जे गर्विष्ठ अंतःकरणाचे आहेत त्यांची त्याने पांगापांग केली आहे. त्याने राज्य करणाऱ्यांना त्यांच्या राजासनांवरून ओढून काढले आहे आणि गरीबास उंचावले आहे. त्याने भूकेल्यास चांगल्या पदार्थांने तृप्त केले आहे. आणि धनवानास रिकाम्या हाताने परत पाठवले आहे. दयेपोटी त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे. आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरण करावी. त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.”

सामायिक करा
लूक 1 वाचा

लूक 1:46-55 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मरीया म्हणाली: “माझा आत्मा प्रभुचे गौरव करतो माझा आत्मा माझ्या तारणार्‍या परमेश्वरामध्ये आनंद करतो, कारण आता त्यांनी त्यांच्या दासीच्या लीन अवस्थेकडे दृष्टी लावली आहे. येथून पुढे सर्व पिढया मला धन्य म्हणतील. कारण ज्या सर्वशक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत, त्यांचे नाव पवित्र आहे. त्यांचे भय बाळगणार्‍यांवर, त्यांची करुणा एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत टिकून राहते. त्यांनी आपल्या बाहूने महान कार्य केले आहेत; जे अंतर्मनाच्या विचारांमध्ये गर्विष्ठ आहेत अशांना त्यांनी विखुरले आहे. त्यांनी शासकांना त्यांच्या सिंहासनावरून खाली आणले आहे. पण नम्रजनांस उच्च केले आहे. भुकेल्यास त्यांनी उत्तम गोष्टींनी तृप्त केले आहे. परंतु श्रीमंतांना रिकामे पाठविले आहे. त्यांचा सेवक इस्राएल यास दयाळू असल्याचे आठवून त्याला साहाय्य पाठविले, जसे आपल्या पूर्वजांना त्यांनी वचन दिले होते, ते अब्राहाम आणि त्यांच्या संततीवर सदासर्वकाळ राहील.”

सामायिक करा
लूक 1 वाचा

लूक 1:46-55 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा मरीया म्हणाली : “‘माझा जीव प्रभूला’ थोर मानतो, आणि ‘देव जो माझा तारणारा’ त्याच्यामुळे माझा आत्मा ‘उल्लासला आहे.’ कारण ‘त्याने’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे.’ पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील! कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरता महत्कृत्ये केली आहेत; आणि ‘त्याचे नाव पवित्र आहे.’ आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’ त्याने आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.’ ‘त्याने अधिपतींना’ राजासनांवरून ‘ओढून काढले आहे’ व ‘दीनांस उंच केले आहे.’ ‘त्याने भुकेलेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे,’ व ‘धनवानांस रिकामे लावून दिले आहे.’ ‘आपल्या पूर्वजांस’ त्याने सांगितले ‘त्याप्रमाणे अब्राहाम’ व त्याचे ‘संतान ह्यांच्यावरील दया’ सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केले आहे.”

सामायिक करा
लूक 1 वाचा

लूक 1:46-55 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मरिया म्हणाली, “माझे अंतःकरण प्रभूला थोर मानते व देव माझा तारणारा ह्याच्यामुळे माझा आत्मा उल्हसित झाला आहे, कारण त्याने त्याच्या सेविकेच्या नम्रतेवर कृपादृष्टी वळवली आहे! ह्यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील; कारण जो सामर्थ्यशाली आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचे भय बाळगतात, त्यांच्यावर त्याची कृपादृष्टी पिढ्यान्पिढ्या असते. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे. त्याने अधिपतींना राजासनांवरून ओढून काढले आहे व दीनांना उच्च स्थान दिले आहे. त्याने भुकेल्यांना चांगल्या पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानांना रिकाम्या हातांनी पाठवून दिले आहे. त्याच्या दयेचे स्मरण ठेवून त्याचा सेवक इस्राएल ह्याला त्याने साहाय्य केले आहे. आपल्या पूर्वजांना म्हणजेच अब्राहाम व त्याच्या वंशजांना दिलेल्या वचनानुसार त्याने हे केले आहे.”

सामायिक करा
लूक 1 वाचा