YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 26:1-26

लेवीय 26:1-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुम्ही आपल्यासाठी मूर्ती करू नयेत; त्याचप्रमाणे कोरीव मूर्ती अथवा स्तंभ उभारू नयेत अथवा आकृती कोरलेला पाषाण पुजण्यासाठी आपल्या देशात स्थापन करू नये, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही माझे शब्बाथ पाळावेत आणि माझ्या पवित्रस्थानाविषयी पूज्यबुद्धी बाळगावी; मी परमेश्वर आहे. तुम्ही माझ्या विधींप्रमाणे चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वागाल, तर नेमलेल्या काळात तुमच्याकरता मी पाऊस पाडीन, जमीन आपला उपज देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील. धान्याची मळणी तुम्ही द्राक्षाच्या हंगामापर्यंत करीत राहाल आणि द्राक्षांची तोडणी तुम्ही पेरणीच्या दिवसापर्यंत करीत राहाल; तुम्ही पोटभर अन्न खाल व आपल्या देशात सुरक्षित राहाल. मी तुमच्या देशाला शांतता देईन व तुम्ही झोपलेले असाल तेव्हा तुम्हांला कोणाची भीती राहणार नाही; मी देशातून हिंस्र पशू नाहीसे करीन, आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही. तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्यापुढे तलवारीने पडतील. तुमच्यातले पाच जण शंभरांना, शंभर जण दहा हजारांना पळवून लावतील आणि तुमचे शत्रू तुमच्यापुढे तलवारीने पडतील. मी तुमच्यावर कृपादृष्टी करून तुम्हांला फलद्रूप व बहुगुणित करीन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करीन. तुम्ही बरेच दिवस साठवून ठेवलेले धान्य खाल व नवीन धान्य आल्यामुळे जुने बाहेर काढाल. मी तुमच्यामध्ये माझी वस्ती करीन आणि माझा जीव तुमचा तिरस्कार करणार नाही. मी तुमच्यामध्ये वावरेन; मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल. मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्ही मिसर्‍यांचे दास राहू नये म्हणूनच मी तुम्हांला मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी तुमची जोखडे मोडून तुम्हांला ताठ मानेने चालवले आहे. परंतु तुम्ही जर माझे ऐकले नाही, ह्या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत, माझ्या विधींचा अव्हेर केला, तुमच्या जिवाने माझे निर्बंध तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला, तर मी तुमचे काय करीन ते ऐका : मी तुम्हांला घाबरे करीन, क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हांला पिडीन; त्यामुळे तुमचे डोळे क्षीण होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल; तुम्ही बियाणे पेराल पण ते व्यर्थ जाईल, कारण त्याचे उत्पन्न तुमचे शत्रू खाऊन टाकतील. मी तुम्हांला विन्मुख होईन; तुमच्या शत्रुंपुढे तुमचा पराभव होईल; तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवतील व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल. इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन, तुमच्या बळाचा गर्व मी मोडून टाकीन. तुम्हांला आकाश लोखंडासारखे व भूमी पितळेसारखी करीन; तुमची मेहनत व्यर्थ जाईल, कारण तुमची भूमी उपज द्यायची नाही व देशातील झाडे फळे देणार नाहीत. तरीही माझ्याविरुद्ध तुम्ही वागलात व माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट अनर्थ आणीन. मी तुमच्यावर वनपशू सोडीन आणि ते तुमची मुले उचलून नेतील, तुमच्या गुराढोरांचा नाश करतील, तुमची संख्या अगदी कमी करतील आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील. एवढ्या गोष्टी करूनही तुम्ही सुधारून माझ्याकडे वळला नाहीत आणि माझ्याविरुद्ध वागलात, तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन. मी तुमच्यावर तलवार आणीन, ती करार मोडल्याचा बदला घेईल; तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल, तेव्हा मी तुमच्यावर मरी पाठवीन; मी तुम्हांला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करीन. मी तुमच्या भाकरीचा आधार मोडीन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच भट्टीत तुमची भाकर भाजतील आणि ती तुम्हांला तोलून परत देतील; ती खाऊन तुमची तृप्ती व्हायची नाही.

सामायिक करा
लेवीय 26 वाचा

लेवीय 26:1-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका, तसेच कोरीव मूर्ती किंवा स्तंभ आकृती कोरलेला पाषाण पूजा करण्यासाठी आपल्या देशात, उभारू नका कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसाची पवित्र शब्बाथांची आठवण ठेवून तो पाळावा आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे. तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या, तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील. तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत रहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत रहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित रहाल. मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हास कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करून येणार नाही. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल. तुमच्यातील पाच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल. मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हास भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन; तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल. मी तुम्हामध्ये माझी वस्ती करीन; आणि मी तुमचा तिरस्कार करणार नाही. मी तुमच्यामध्ये चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल. मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हास मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हास पुन्हा ताठ चालवले आहे! परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत; तुम्ही जर माझे विधि मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला. जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यानी मी तुम्हास पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हास यश मिळणार नाही तुम्हास पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील. मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल. या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हास सातपट शिक्षा करीन. मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन. तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत. तरीसुध्दा तुम्ही माझ्याविरूद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हावर तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक संकटे आणीन. मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना उचलून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; आणि तुमची संख्या कमी करतील. त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील. एवढे करुनही तुम्ही माझ्या शिक्षणाचा स्वीकार केला नाही परंतु माझ्या विरुध्द चालत राहिलात, तर मी ही तुमच्याविरुध्द होईन आणि, मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट ताडण करीन. मी तुमच्यावर तलवार आणीन ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपआपल्या नगरांत जमा व्हाल, तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन, आणि तुम्ही तुमच्या शत्रुच्या बळामुळे पराभुत व्हाल. मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हास तोलून देतील; ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही.

सामायिक करा
लेवीय 26 वाचा

लेवीय 26:1-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“ ‘तुम्ही आपणासाठी घडीव मूर्ती किंवा कोरीव मूर्ती किंवा मूर्तिस्तंभ यांची स्थापना करू नये, अथवा आपल्या देशात नतमस्तक होण्यासाठी कोरीव दगड ठेवू नये. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. “ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा, मी याहवेह आहे. “ ‘माझ्या विधीनुसार तुम्ही चालाल आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल, तर मी हंगामात तुमच्यासाठी पाऊस पाठवेन आणि जमीन पीक देईल आणि झाडे फळ देतील. द्राक्षमळ्याची कापणी होईपर्यंत तुझी मळणी सुरूच राहील आणि द्राक्षांची कापणी पेरणी होईपर्यंत चालू राहील आणि पोटभर अन्न खाऊन तुम्ही तृप्त व्हाल आणि देशात सुरक्षित राहाल. “ ‘मी तुम्हाला शांती देईन म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे झोप घ्याल. उपद्रव देणारे पशू मी हाकलून देईन आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि तुमच्यासमोर ते तलवारीने पडतील. तुम्हातील पाचजण शंभरांचा व शंभर दहा हजारांचा पाठलाग करून सर्व शत्रूंचा पराजय करतील आणि तुमचे शत्रू तलवारीने तुमच्यासमोर पडतील. “ ‘मी तुमच्यावर कृपादृष्टी करेन, तुम्हाला बहुगुणित करेन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करेन. तुम्ही अजूनही मागील कापणी खात राहाल, तुमच्या शेतात इतके भरपूर पीक येईल की, ते साठविण्यासाठी तुम्हाला जुने धान्य बाहेर काढावे लागेल. मी तुमच्यामध्ये वस्ती करेन व मला तुमचा तिटकारा वाटणार नाही. मी तुमच्यामध्ये चालेन; मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. इजिप्तच्या लोकांचे तुम्ही गुलाम राहू नये म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्त देशामधून बाहेर आणले; तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. मी तुमच्या बेड्या तोडून टाकल्या आणि तुम्ही ताठ मानेने चालाल असे मी केले आहे. “ ‘पण तुम्ही माझे ऐकले नाही आणि या सर्व आज्ञा पाळल्या नाही, आणि माझे विधी तुम्ही स्वीकारले नाही आणि माझे नियम तुच्छ लेखून माझ्या आज्ञा पाळण्यात कसूर केली आणि माझ्या कराराचा भंग केला, तर मी तुमच्यासोबत हे करेन: तुम्हाला एकाएकी भयंकर भीतीने ग्रासून टाकेन, तुम्हाला क्षयरोग होईल व असे भयंकर ज्वर तुम्हाला पछाडतील की त्यामुळे तुमचे नेत्र अंधुक होतील आणि तुमची शक्ती कोमेजून जाईल. तुम्ही केलेली धान्याची पेरणी व्यर्थ जाईल, कारण तुमचे पीक तुमचे शत्रू खाऊन टाकतील. मी तुम्हापासून आपले मुख फिरवेन आणि तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव होईल. ज्यांचा तुम्ही द्वेष करता तेच तुमच्यावर सत्ता गाजवतील आणि कोणी पाठलाग करीत नसतानाही तुम्ही पळाल. “ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करेन. मी तुमच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा करेन आणि तुमचे आकाश लोखंडासारखे व पृथ्वी कास्यासारखी करून टाकेन. तुमची मेहनत व्यर्थ गोष्टींमुळे नाश पावेल, कारण तुमची जमीन पिके देणार नाही व तुझ्या देशातील झाडांना फळे येणार नाहीत. “ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल व माझे ऐकले नाही, तर मी तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट पीडा आणेन. मी तुमच्यावर जंगली श्वापदे पाठवेन आणि ती तुमच्या लेकरांना उचलून नेतील, गुरांचा नायनाट करतील आणि तुमची संख्या कमी करतील; आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओसाड होतील. “ ‘एवढे करून सुद्धा तुमच्यात सुधारणा झाली नाही आणि माझ्याविरुद्ध तुम्ही वागत राहिलात, तर मी तुमच्याविरुद्ध होईन आणि तुमच्या पापाबद्दल सात वेळा तुम्हाला ताडण करेन. माझा करार मोडल्याबद्दल तुमच्यावर तलवार आणेन. तुम्ही आपआपल्या शहरांत एकत्र व्हाल, तेव्हा तिथे मी तुमच्यामध्ये प्राणघातक रोग पाठवेन आणि तुम्हाला तुमच्या शत्रूच्या हाती देण्यात येईल. मी तुमच्या भाकरीचा पुरवठा बंद करेन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर भाकर भाजू शकतील आणि त्या भाकरीचे वजन करून देतील. तुम्ही खाल परंतु तृप्त होणार नाहीत.