लेवीय 11:12-18
लेवीय 11:12-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टीने खाण्यास योग्य नाहीत ते ओंगळ समजावे.” देवाच्या दृष्टीने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरुड, गीध, कुरर, घार, निरनिराळ्या जातीचे ससाणे, निरनिराळ्या जातीचे कावळे, शहामृग, गवळण, कोकीळ, निरनिराळ्या जातीचे बहिरी ससाणे, पिंगळा, करढोक, मोठे घुबड, पांढरे घुबड, पाणकोळी, गिधड
लेवीय 11:12-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांना कल्ले व खवले नाहीत असा प्रत्येक जलचर प्राणी तुम्हाला निषिद्ध आहे. “जे पक्षी तुम्ही अशुद्ध समजावेत आणि ते तुम्ही खाऊ नयेत कारण ते अशुद्ध आहेत ते हे: गरुड, गिधाड, काळे गिधाड, लाल पतंग, कोणत्याही जातीचे काळे पतंग, कोणत्याही जातीचे कावळे, शिंग असलेले घुबड, किंचाळणारे घुबड, समुद्रपक्षी, सर्व जातीचे बहिरी ससाणे, लहान घुबड, करढोक, मोठे घुबड, पांढरे घुबड, वाळवंटी घुबड, कुरर
लेवीय 11:12-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जलाशयांतल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते सर्व ओंगळ समजावेत. पक्ष्यांपैकी ओंगळ समजून खाऊ नयेत ते हे, कारण ते ओंगळ आहेत : गरुड, लोळणारा गीध, कुरर, घार, निरनिराळ्या जातींचे ससाणे, निरनिराळ्या जातींचे कावळे, शहामृग, गवळण,2 कोकीळ, निरनिराळ्या जातींचे बहिरी ससाणे, पिंगळा, करढोक, मोठे घुबड, पांढरे घुबड, पाणकोळी, गिधाड