विलापगीत 3:21-25
विलापगीत 3:21-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते. ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे. ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे. माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.” जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्यास शोधतो, त्याला परमेश्वर चांगला आहे.
सामायिक करा
विलापगीत 3 वाचाविलापगीत 3:21-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. “परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला, परमेश्वर प्रसन्न होतो.
सामायिक करा
विलापगीत 3 वाचा