YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहूदा 1:17-21

यहूदा 1:17-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पण प्रियांनो, तुम्ही तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची तुम्ही आठवण करा; त्यांनी तुम्हास म्हणले होते की, “शेवटच्या काळात टवाळखोर माणसे उठतील व आपल्या भक्तिहीन वासनांप्रमाणे चालतील.” हे फूट पाडणारे लोक देहबुद्धी स्वभावाचे, आत्मा नसलेले लोक आहेत. पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, तुम्ही सर्वकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा.

सामायिक करा
यहूदा 1 वाचा

यहूदा 1:17-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परंतु, प्रिय मित्रांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या प्रेषितांनी तुम्हाला जे पूर्वी सांगितले, त्याची आठवण ठेवा. त्यांनी तुम्हाला सांगितले, “शेवटच्या दिवसात निंदा करणारे स्वतःच्या अनीतिमान वासनांच्या मागे लागतील.” हे लोक तुमच्यामध्ये फूट पाडणारे, उपजत स्वभावाने वागणारे आणि पवित्र आत्मा नसलेले आहेत. परंतु तुम्ही, प्रिय मित्रांनो, स्वतःला परमपवित्र विश्वासाच्या पायावर बांधा आणि पवित्र आत्म्याद्वारे प्रार्थना करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्यांच्या कृपेने ज्या अनंतकाळच्या जीवनात नेणार आहेत त्याची वाट पाहत असताना आपणास परमेश्वराच्या प्रीतीमध्ये राखा.

सामायिक करा
यहूदा 1 वाचा

यहूदा 1:17-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

परंतु प्रियजनहो, तुम्ही मात्र आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा. ते तुम्हांला असे सांगत असत की, शेवटच्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील. ती फूट पाडणारी, देहवासनांनी प्रभावित, ज्यांना पवित्र आत्मा मिळाला नाही, अशी आहेत. प्रियजनहो, तुम्ही मात्र आपल्या परमपवित्र श्रद्धेवर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, शाश्वत जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा आणि आपल्याला देवाच्या प्रीतीमध्ये राखा.

सामायिक करा
यहूदा 1 वाचा