यहूदा 1:14-15
यहूदा 1:14-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आदामापासून सातवा, हनोख, ह्यानेही यांच्याविषयी संदेश देऊन म्हणले आहे की, “बघा, प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला. तो सर्वांचा न्यायनिवाडा करावयास व त्यांच्यातील सर्व भक्तिहीन लोकांस, त्यांनी भक्तिहीनपणे केलेल्या भक्तिहीन कृतीविषयी आणि भक्तिहीन पाप्यांना, त्याच्याविरुध्द त्यांनी म्हटलेल्या सर्व कठोर गोष्टींविषयी दोषी ठरविण्यास येत आहे.”
यहूदा 1:14-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आदामानंतर सातव्या पिढीचा मनुष्य हनोख, याने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली: “पाहा, प्रभू आपल्या हजारो आणि हजारो पवित्र जणांसह येत आहेत सर्वांचा न्याय करण्यासाठी, आणि जे सर्व अनीतिमान कृत्ये त्यांनी अनीतिमानामध्ये केली, आणि अनीतिमान पाप्यांनी त्याच्याविरुद्ध जे सर्व विद्रोही शब्द बोलले त्या सर्वांना तो दोषी ठरवेल.”
यहूदा 1:14-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आदामापासून सातवा पुरुष हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की, “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करण्यास आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांना दोषी ठरवण्यास प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.”1
यहूदा 1:14-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आदामपासून सहावा वंशज हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला की, पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि अधार्मिक लोकांनी अभक्तीने केलेल्या सर्व दुष्ट कृत्यांवरून आणि जे सर्व भयंकर शब्द अधार्मिक पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितले त्यावरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभू आपल्या हजारो पवित्र देवदूतांसह येईल.