यहोशवा 4:19-24
यहोशवा 4:19-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे तळ दिला. यार्देनेतून उचलून आणलेले बारा धोंडे यहोशवाने गिलगाल येथे रचले. तो इस्राएल लोकांस म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपल्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, ‘इस्राएल लोक ह्या यार्देनेच्या कोरड्या भूमीतून पार गेले. आम्ही तांबडा समुद्र पार करेपर्यंत, तुमचा देव परमेश्वर याने जसे तांबड्या समुद्राचे पाणी आटवून कोरडे केले, तसेच परमेश्वर तुमचा देव ह्याने यार्देनेचे पाणी आम्ही तिच्यातून चालत पार आलो तोपर्यंत आमच्यापुढून हटवले. ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व लोक जाणतील आणि तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे निरंतर भय बाळगाल.”
यहोशवा 4:19-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे डेरे दिले. यार्देनेतून उचलून आणलेले बारा धोंडे यहोशवाने गिलगाल येथे उभे केले. तो इस्राएल लोकांना म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपापल्या वडिलांना विचारतील, ‘ह्या धोंड्यांचे महत्त्व काय?’ तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, ‘इस्राएल ह्या यार्देनेच्या कोरड्या पात्रातून चालत पार आले.’ आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तो आटवून कोरडा केला होता, त्याचप्रमाणे तुम्ही यार्देन पार करीपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तिचे पाणी आटवून ती कोरडी केली. ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळेल, आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचा त्यांना1 निरंतर धाक वाटेल.”