यहोशवा 2:8-11
यहोशवा 2:8-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इकडे हे हेर झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली, आणि त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हांला दिला आहे. आम्हांला तुमची दहशत बसली आहे, आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे; कारण तुम्ही मिसर देशाहून निघालात तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोर्यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.
यहोशवा 2:8-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती त्यांच्याकडे धाब्यावर गेली, ती म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे, आम्हांला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाश्यांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला माहीत आहे. कारण तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोऱ्यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमचे अवसान गळून गेले आणि कोणामध्येही धैर्य राहिले नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.
यहोशवा 2:8-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
रात्री ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती घराच्या धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत. कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्या सीहोन व ओग या दोन अमोर्यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे. जेव्हा आम्ही या गोष्टी ऐकल्या, तेव्हा आमची अंतःकरणे भीतीने थरारून गेली आणि प्रत्येकाचे धैर्य थंड पडले, कारण याहवेह जे तुमचे परमेश्वर वर स्वर्गात आहेत ते परमेश्वर पृथ्वीवर सुद्धा आहेत.