योना 4:1-3
योना 4:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु यामुळे योनाला फार वाईट वाटले व त्यास राग आला. तो परमेश्वराजवळ विनवणी करू लागला, “हे परमेश्वरा, मी माझ्या देशात होतो तेव्हा माझे सांगणे हेच होते की नाही? म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची घाई केली, कारण मला माहित होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न आहेस. संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहेस. माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, माझा जीव घे, कारण जिवंत राहण्यापेक्षा मला मरण चांगले वाटते.”
योना 4:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याचे योनाला फार वाईट वाटले व त्याला राग आला. तो परमेश्वराला विनंती करू लागला की, “हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही! म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस. तर आता, हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.”