YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योना 2:5-10

योना 2:5-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले; आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले, समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले. मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले; तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे. जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली. जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात, ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात. परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन; जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, तारण परमेश्वराकडूनच आहे.” मग परमेश्वराने त्या मोठ्या माश्याला आज्ञा केली; तेव्हा त्याने योनाला कोरडया भूमीवर ओकून टाकले.

सामायिक करा
योना 2 वाचा

योना 2:5-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

बुडविणार्‍या पाण्याने मला घाबरविले, माझ्या सभोवताली खोल डोह होता; माझे डोके समुद्राच्या शेवाळाने गुंडाळले होते. मी पर्वतांच्या मुळाशी पोहोचलो होतो; मी कायमचा जमिनीत बंदिस्त झालो होतो. तरीसुद्धा, हे याहवेह माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा जीव खड्ड्यातून वर आणला. “जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते, तेव्हा मी याहवेहचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना वर तुमच्याकडे, तुमच्या पवित्र मंदिराकडे पोहोचली. “जे निरुपयोगी मूर्तींना कवटाळून राहतात ते स्वतःला परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर ठेवतात. परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने, तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन. मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन. मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ ” मग याहवेहने माशाला आज्ञा केली आणि त्याने योनाहला कोरड्या भूमीवर ओकून टाकले.

सामायिक करा
योना 2 वाचा

योना 2:5-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चोहोकडून मला घेरले; समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टले. मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते; तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धरला आहेस. माझा जीव माझ्या ठायी व्याकूळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले; माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहचली. जे निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास सोडून देतात; पण मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.” परमेश्वराने माशाला आज्ञा केली, तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले.

सामायिक करा
योना 2 वाचा