YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योना 1:7-10

योना 1:7-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ते सर्व एकमेकाला म्हणाले, “चला आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर आले आहे; हे आपणास कळेल.” त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. तेव्हा त्यांनी योनाला म्हटले, “आम्ही तुला विनंती करतो, कोणामुळे हे संकट आम्हावर आले आहे, हे तू आम्हास सांग; तुझा धंदा काय आहे आणि तू कोठून आला आहेस? तुझा देश कोणता आणि तू कोणत्या लोकांपैकी आहेस?” योनाने त्यांना म्हटले; “मी इब्री आहे; ज्या स्वर्गातल्या देवाने समुद्र व कोरडी भूमी उत्पन्न केली त्या परमेश्वराचे मी भय धरतो.” मग त्या लोकांस अत्यंत भीती वाटली; आणि ते योनाला म्हणाले, “तू हे काय केले?” कारण त्या लोकांनी जाणले की तो परमेश्वरासमोरून पळून जात आहे, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते.

सामायिक करा
योना 1 वाचा

योना 1:7-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तेव्हा खलाशी एकमेकांना म्हणाले, “आपण चिठ्ठ्या टाकून कोणामुळे हे संकट आले आहे ते शोधू या.” मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि योनाहच्या नावाने चिठ्ठी निघाली. यावर त्यांनी योनाहला विचारले, “आम्हाला सांग, आमच्यावर हे संकट कोणामुळे आले आहे? तू काय काम करतो? तू कुठे राहतो? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस?” योनाहने त्यांना उत्तर दिले, “मी एक इब्री आहे आणि मी स्वर्गातील याहवेह परमेश्वराची उपासना करतो, ज्यांनी समुद्र आणि कोरडी जमीन निर्माण केली.” हे ऐकून ते घाबरले आणि योनाहला म्हणाले, “तू हे काय केलेस?” (कारण योनाहने त्यांना सांगितले होते की तो याहवेहच्या उपस्थितीतून पळून जात आहे.)

सामायिक करा
योना 1 वाचा

योना 1:7-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्यांनी एकमेकांना म्हटले, “चला, आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपल्यावर ओढवले हे आपल्याला कळेल.” त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, “कोणामुळे हे संकट आमच्यावर आले सांग; तुझा धंदा काय? तू आलास कोठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस?” तो त्यांना म्हणाला, “मी इब्री आहे; ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे.” तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली; ते त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस?” तो परमेश्वरासमोरून पळून चालला आहे हे त्यांना कळले, कारण त्याने त्यांना तसे सांगितले होते.

सामायिक करा
योना 1 वाचा