YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 41:1-11

ईयोब 41:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुला लिव्याथानाला गळ टाकून पकडता येईल का? तुला त्याची जीभ दोरीने बांधता येईल का? तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्यास वेसण घालता येईल का? किंवा त्याच्या जबड्यात गळ घालता येईल का? लिव्याथान तुझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करील का? तो तुझ्याशी मृदू शब्दात बोलेल का? लिव्याथान तुझ्याशी करार करून जन्मभर तुझा दास होऊन राहील का? तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का? तू त्यास दोरीने बांधशील का? तुझ्या मुली त्याच्याशी खेळू शकतील काय? मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का? ते त्याचे तुकडे करून ते व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करतील का? तू लिव्याथानाच्या कातडीत किंवा डोक्यात बरच्या फेकशील का? तू एकदा का लिव्याथानावर हात टाकलास तर पुन्हा तसे कधी करु शकणार नाहीस. ती कशा प्रकारची लढाई असेल याचा एकदा विचार कर. तू लिव्याथानाचा पराभव करु शकशील असे तुला वाटत असेल तर ते विसरून जा. तशा आशेला जागाच नाही. त्याच्याकडे नजर टाकताच तुझी भीतीने गाळण उडेल. एकही मनुष्य त्यास जागे करून त्याचा राग ओढवून घेण्याइतका शूर नाही. “माझ्याविरुध्द उभा राहणाराही कोणी नाही. मला कोणी काही प्रथम दिले नाही म्हणून मी त्यांची परत फेड करू? या नभोमंडळाखाली जे जे आहे ते सर्व माझे आहे.

सामायिक करा
ईयोब 41 वाचा

ईयोब 41:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

“लिव्याथानास1 गळ घालून तुला ओढता येईल काय? दोरीने त्याची जीभ तुला दाबून धरता येईल काय? त्याच्या नाकात लव्हाळ्याची वेसण तुला घालता येईल काय? त्याच्या जबड्यात गळ रोवता येईल काय? तो तुझे आर्जव करीत राहील काय? तो तुला लाडीगोडी लावील काय? मी तुझा सतत दास होऊन राहीन, अशी आणभाक तो तुझ्याशी करील काय? लहान पक्ष्याशी खेळतात तसा तू त्याच्याशी खेळशील काय? त्याला बांधून तुझ्या कुमारीस तो खेळायला देशील काय? धीवरांचे संघ त्याचा व्यापार करतील काय? त्याला विभागून ते व्यापार्‍यांना2 देतील काय? त्याच्या कातडीत तू शूळ रोवशील काय? मासे मारण्याच्या बरच्या त्याच्या डोक्यात खुपसशील काय? तू त्याला हात लावून तर पाहा, ह्या झटापटीची आठवण तुला पक्की राहील; आणि पुन्हा तू तसे करणार नाहीस. पाहा, त्याला धरू पाहणार्‍याची आशा निष्फळ होते; त्याला पाहूनच एखादा गांगरून जाणार नाही काय? त्याला चिडवण्याचे धाडस कोणी करणार नाही; तर मग माझ्यासमोर टिकेल असा कोण आहे? मला कोणी प्रथम काही दिले आहे काय की मी त्याची फेड करू? अखिल नभोमंडळाखाली जे काही आहे ते माझे आहे.

सामायिक करा
ईयोब 41 वाचा