YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 33:13-29

ईयोब 33:13-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तू त्याच्याशी का वाद घालत आहेस? तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही. देव एकदा बोलतो, होय दोनदा बोलतो, तरी मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही. देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल, जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो. नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो, आणि त्याच्या धमकीने घाबरवितो. मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी, आणि गर्व न करण्याचेही सांगतो. देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो, त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो. मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात. नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही चांगल्या अन्नाचासुध्दा त्यास तिरस्कार वाटतो. त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात. खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते. परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला, मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक, त्यास चांगला मार्ग दाखवणारा. आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल. ‘या मनुष्यास मृत्युलोकात जाण्यापासून वाचव त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’ मग त्याचे शरीर पुन: बालकासारखे जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल. तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल. म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल. नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही. त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल. माझ्या जीव नियमीत त्याचा प्रकाश पाहील. पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो, दोनदा, होय तीनदा

सामायिक करा
ईयोब 33 वाचा

ईयोब 33:13-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

‘तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही,’ म्हणून का तू त्याच्याशी वाद घालतोस? देव एका प्रकारे नव्हे तर दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो; पण तो त्याकडे चित्त देत नाही. स्वप्नस्थितीत, रात्रीच्या दृष्टान्तात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछान्यावर पडून झोप घेत असता, देव त्याचे कान उघडतो; त्याला प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो. तेणेकरून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालतो, पुरुषाच्या गर्वाचा परिहार करतो; तो त्याचा जीव गर्तेपासून राखतो. शस्त्राने होणार्‍या नाशापासून त्याचा जीव वाचवतो. कोणाला अशी शिक्षा होते की तो क्लेश भोगत बिछान्यावर लोळत राहतो; त्याच्या हाडांची एकसारखी तडफड चालते; त्याचा जीव अन्नाला कंटाळतो, त्याच्या मनाला मिष्टान्नाचा तिटकारा येतो. त्याचा देह गळून तो दिसतो न दिसतोसा होतो; त्याची हाडे पूर्वी दिसत नसत, ती बाहेर येतात. शेवटी तो गर्तेजवळ जाऊन ठेपतो, त्याचे जीवन नाश करणार्‍यांच्या तावडीत जाते. मनुष्याला सन्मार्ग दाखवणारा हजारांत एक असा कोणी मध्यस्थ दिव्यदूत त्याला आढळला, तर देव त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणेल, ‘ह्याचा बचाव कर, ह्याला गर्तेत पडू देऊ नकोस; मला खंड मिळाला आहे.’ मग त्याचे शरीर बालकाच्या शरीरापेक्षा टवटवीत होते; त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुन्हा प्राप्त होतात. तो देवाची प्रार्थना करतो, आणि तो त्याच्यावर प्रसन्न होतो; तो आनंदाने त्याचे दर्शन घेतो; देव त्याची निर्दोषता पूर्ववत स्थापित करतो. तो गाणी गाऊन लोकांना म्हणतो, ‘मी पाप केले होते; मी सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने चाललो होतो, त्याचे प्रायश्‍चित्त मला मिळाले नाही; त्याने माझा जीव राखला, मला गर्तेत पडू दिले नाही, माझ्या जिवाला प्रकाश लाभला आहे.’ पाहा, हे सर्व देव मनुष्याला दोनतीनदा करतो

सामायिक करा
ईयोब 33 वाचा