ईयोब 31:35-37
ईयोब 31:35-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहो, माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते. पाहा, मला माझी बाजू मांडू द्या, सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते. खरेच, मी ती खूण माझ्या गळ्याभोवती घालेन. मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवेन. त्याने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करून मी त्याकडे येऊ शकेन.
सामायिक करा
ईयोब 31 वाचाईयोब 31:35-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझे कोणी ऐकणारा असता तर किती बरे होते! (हेच माझे दस्तखत; सर्वसमर्थाने मला जाब द्यावा;) माझ्या प्रतिवाद्याचा लेखी आरोप दाखल झाला असता तर बरे झाले असते. तो मी आपल्या खांद्यावर वागवला असता; शिरोभूषणाप्रमाणे तो डोक्याला वेष्टला असता. मी पावलापावलाचा हिशोब त्याला दिला असता; त्याच्याजवळ मी सरदारासारखा गेलो असतो.
सामायिक करा
ईयोब 31 वाचा