YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 19:23-29

ईयोब 19:23-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अहो, मी जे बोलतो ते कुणीतरी लिहून ठेवावे! अहो, ते पुस्तकात नमुद करून ठेवायला हवेत. अहो, मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे. माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे. आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील. मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन. मी देवाला बघेन, तर मी स्वत:च त्यास पाहीन, माझे डोळे त्यास पाहतील, आणि ते परक्यासारखे राहणार नाही. माझा अतंरात्मा झुरत आहे. या सगळ्याचे मूळ माझ्याकडेच आढळून आले आहे, म्हणून याचा छळ कोणत्या प्रकारे करावा असे तुम्ही म्हणाल. तर तुम्हास तलवारीची भीती वाटायला हवी, कारण रागामुळे तलवारीने शासन होते, यावरुन तुम्हास कळेल की न्याय आहे.”

सामायिक करा
ईयोब 19 वाचा

ईयोब 19:23-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

माझे शब्द लिहून काढले, ते ग्रंथात लिहून ठेवले, लोखंडी कलमाने शिळेवर खोदून त्यात शिसे भरून ते कायमचे केले, तर किती बरे होईल! मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील; ही माझी त्वचा छिन्नभिन्न होऊन नष्ट झाली, तरी मी देवाला देहविरहित पाहीन; त्याला मी स्वतः पाहीन, इतरांचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे! ह्या सगळ्याचे मूळ माझ्या ठायीच आढळून आले आहे, म्हणून ‘ह्याचा छळ आपण कोणत्या प्रकारे करावा,’ असे तुम्ही म्हणाल, तर तुम्ही तलवारीचे भय धरा; कारण क्रोधाबद्दल तलवारीचे शासन होते, ह्यावरून न्याय आहे हे तुम्हांला समजावे.”

सामायिक करा
ईयोब 19 वाचा