योहान 9:1-4
योहान 9:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, “रब्बी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई-वडीलांच्या?” येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा याच्या आई-वडीलाने पाप केले असे नाही, तर याच्याठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही.
योहान 9:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू जात असताना, त्यांनी एका जन्मांध मनुष्यास पाहिले, तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, कोणी पाप केले, या मनुष्याने की त्याच्या आईवडिलांनी, ज्यामुळे हा आंधळा जन्मला?” येशूंनी उत्तर दिले, “त्याने किंवा त्याच्या आईवडिलांनी पाप केले नाही, परंतु हे यासाठी झाले की परमेश्वराची कृत्ये त्याच्यामध्ये प्रकट व्हावी. जोपर्यंत दिवस आहे, तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्यांची कार्ये आपल्याला केली पाहिजेत. रात्र येत आहे, तेव्हा कोणी काही करू शकत नाही.
योहान 9:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? ह्याच्या किंवा ह्याच्या आईबापांच्या?” येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला2 केली पाहिजेत; रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही.
योहान 9:1-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
रस्त्याने जात असता येशूने एका जन्मांध माणसाला पाहिले. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरुवर्य, कोणी पाप केले, ह्याने की ह्याच्या आईबापांनी, म्हणून हा असा आंधळा जन्मला?” येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले म्हणून नव्हे, पण ह्याच्याठायी देवाचे कार्य दिसावे ह्यासाठी. ज्याने मला पाठवले त्याची कामे मी दिवस आहे तोपर्यंत केली पाहिजेत. रात्र येणार आहे, मग कोणालाही काम करता येणार नाही.