योहान 8:32-36
योहान 8:32-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.” ते त्याला म्हणाले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो; तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदासर्वदा राहत नाही, पुत्र सदासर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल.
योहान 8:32-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील.” त्यांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत आणि कधीही कोणाचे दास झालो नाही. तुम्ही आम्हास कसे म्हणता की, तुम्ही स्वतंत्र केले जाल?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास सर्वकाळ घरात राहत नाही; पुत्र सर्वकाळ घरात राहत. म्हणून जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही, खरोखर, बंधनमुक्त व्हाल.
योहान 8:32-36 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करील.” त्यांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर आम्हाला स्वतंत्र करण्यात येईल, असे तुम्ही कसे म्हणता?” त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला खरोखर सांगतो की, जो प्रत्येकजण पाप करतो तो पापाचा दास आहे. आता दासाला कुटुंबात कायम राहता येत नाही, परंतु पुत्र तेथे सदासर्वदा राहतो. म्हणून पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केले, तरच तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल.
योहान 8:32-36 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.” त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्ही अब्राहामचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या गुलामगिरीत नव्हतो, तर ‘तुम्ही बंधमुक्त व्हाल’, असे कसे म्हणता?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी पाप करतो, तो पापाचा गुलाम असतो. गुलाम घरात सदासर्वदा राहत नाही परंतु पुत्र सदासर्वदा राहतो. म्हणून जर पुत्राने तुम्हांला बंधमुक्त केले, तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल.