योहान 7:37-39
योहान 7:37-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते.
योहान 7:37-39 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग सणाच्या शेवटच्या म्हणजे सर्वात महत्वाच्या दिवशी, येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी तान्हेले असतील, त्यांनी माझ्याकडे यावे आणि प्यावे. जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात, शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे, त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” त्यांच्या म्हणण्याचा अर्थ पवित्र आत्मा, ज्यांनी विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला दिला जाणार होता. परंतु तो आत्मा दिला गेला नव्हता, कारण येशूंचे गौरव अद्याप झाले नव्हते.
योहान 7:37-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” (ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले; तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता; कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता.)
योहान 7:37-39 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सणाच्या शेवटच्या महान दिवशी, येशूने उभे राहून जाहीर आवाहन केले, “ज्याला तहान लागली आहे, त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या अंतःकरणातून, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जीवनदायक पाण्याच्या नद्या वाहतील.” त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना जो पवित्र आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. पवित्र आत्मा त्या वेळेपर्यंत दिलेला नव्हता कारण तोपर्यंत येशूचा गौरव झालेला नव्हता.