योहान 7:3-5
योहान 7:3-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू इथून नीघ आणि यहूदीया प्रांतात जा, म्हणजे तू करतोस ती तुझी कामे तुझ्या शिष्यांनीही पाहावीत. जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही. तू या गोष्टी करीत असशील तर स्वतः जगाला प्रकट हो.” कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.
योहान 7:3-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंचे भाऊ त्यांना म्हणाले, “तुम्ही गालीलातून निघून यहूदीयात जा, म्हणजे तेथील तुमच्या शिष्यांना जे कार्य तुम्ही करता ते पाहावयास मिळेल. ज्याला प्रसिद्धी पाहिजे असा कोणी गुप्तपणे काही करीत नाही. तुम्ही या गोष्टी करीत आहात, तर जगाला प्रकट व्हा.” कारण त्यांच्या भावांचा देखील त्यांच्यावर विश्वास नव्हता.
योहान 7:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “जी कामे तू करतोस ती तुझ्या शिष्यांनीही पाहावीत म्हणून तू येथून निघून यहूदीयात जा. जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही; तू ही कामे करत असशील तर स्वतः जगाला प्रकट हो.” कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.
योहान 7:3-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “तू जे कार्य करतोस, ते तुझ्या शिष्यांनीही पाहावे म्हणून तू येथून निघून यहुदियात जा. जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो, तो गुप्तपणे काही करत नाही. तू हे कार्य करत आहेस, हे जगाला दाखव.” त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.