YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 7:1-9

योहान 7:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यानंतर येशू गालीलात फिरू लागला; कारण यहूदी त्याला जिवे मारायला पाहत होते, म्हणून त्याला यहूदीयात फिरावेसे वाटले नाही. यहूद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता. म्हणून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “जी कामे तू करतोस ती तुझ्या शिष्यांनीही पाहावीत म्हणून तू येथून निघून यहूदीयात जा. जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही; तू ही कामे करत असशील तर स्वतः जगाला प्रकट हो.” कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्यावरून येशू त्यांना म्हणाला, “माझा समय अजून आला नाही; तुमचा समय तर सर्वदा सिद्ध आहे. जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण त्याची कृत्ये वाईट आहेत अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो. तुम्ही वर सणाला जा; माझा समय अजून पूर्ण झाला नाही, म्हणून मी काही आताच ह्या सणास जात नाही.” असे त्यांना सांगून तो गालीलात राहिला.

सामायिक करा
योहान 7 वाचा

योहान 7:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यानंतर येशू गालील प्रांतात फिरू लागला, कारण यहूदी अधिकारी त्यास ठार मारायला पाहत होते. म्हणून त्यास यहूदीया प्रांतात फिरावेसे वाटले नाही. यहूद्यांचा मंडपाचा सण जवळ आला होता. म्हणून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू इथून नीघ आणि यहूदीया प्रांतात जा, म्हणजे तू करतोस ती तुझी कामे तुझ्या शिष्यांनीही पाहावीत. जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही. तू या गोष्टी करीत असशील तर स्वतः जगाला प्रकट हो.” कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्यावरून येशू त्यांना म्हणाला, “सणाला जाण्याची माझी वेळ अजून आलेली नाही; तुमची वेळ तर सर्वदा सिद्ध आहे. जगाने तुमचा द्वेष करवा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्यांची कामे वाईट आहेत. तुम्ही सणाला वर जा. मी या सणाला आताच वर जात नाही कारण माझी वेळ अजून पूर्ण झालेली नाही.” असे त्यांना सांगून तो गालील प्रांतात राहिला.

सामायिक करा
योहान 7 वाचा

योहान 7:1-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यानंतर, येशू गालीलाच्या अवतीभोवती फिरले. त्यांना यहूदीया प्रांतातून जाण्याची इच्छा नव्हती, कारण तेथील यहूदी पुढारी त्यांना जिवे मारण्यासाठी मार्ग शोधत होते. परंतु जेव्हा यहूदीयांच्या मंडपाचा सण जवळ आला, येशूंचे भाऊ त्यांना म्हणाले, “तुम्ही गालीलातून निघून यहूदीयात जा, म्हणजे तेथील तुमच्या शिष्यांना जे कार्य तुम्ही करता ते पाहावयास मिळेल. ज्याला प्रसिद्धी पाहिजे असा कोणी गुप्तपणे काही करीत नाही. तुम्ही या गोष्टी करीत आहात, तर जगाला प्रकट व्हा.” कारण त्यांच्या भावांचा देखील त्यांच्यावर विश्वास नव्हता. यावर येशूंनी त्यांना म्हटले, “माझी वेळ अद्यापि आलेली नाही; तुम्हाला कोणतीही वेळ योग्यच आहे. जग तुमचा द्वेष करू शकत नाही, परंतु माझा द्वेष करते, कारण जगाची कर्मे दुष्ट आहेत अशी मी त्यांच्याविषयी साक्ष देतो. तुम्ही सणास जा. मी या सणास वर जात नाही कारण माझी वेळ अजून आली नाही.” त्यांना असे सांगितल्यावर, ते गालीलातच राहिले.

सामायिक करा
योहान 7 वाचा

योहान 7:1-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्यानंतर येशू गालीलमध्ये फिरू लागला, यहुदी त्याला ठार मारायला पाहत होते म्हणून त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही. यहुदी लोकांचा मंडपांचा सण जवळ आला होता, तेव्हा त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “तू जे कार्य करतोस, ते तुझ्या शिष्यांनीही पाहावे म्हणून तू येथून निघून यहुदियात जा. जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो, तो गुप्तपणे काही करत नाही. तू हे कार्य करत आहेस, हे जगाला दाखव.” त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. येशू त्यांना म्हणाला, “माझी उचित वेळ अजून आली नाही, तुमची वेळ तर नेहमीच उचित असते. जग तुमचा द्वेष करू शकत नाही, पण ते माझा द्वेष करते कारण त्याची कृत्ये वाईट आहेत, अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो. तुम्ही सणाला जा, मी ह्या सणाला जाणार नाही. कारण माझी उचित वेळ अजून आली नाही.” असे त्यांना सांगून तो गालीलमध्ये राहिला.

सामायिक करा
योहान 7 वाचा