योहान 6:66-69
योहान 6:66-69 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यानंतर, त्याच्या शिष्यांतले पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. तेव्हा येशू बाराजणांना म्हणाला, “तुमची पण जायची इच्छा आहे काय?” तेव्हा शिमोन पेत्राने त्यास उत्तर दिले, “प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाकडे आहेत. आणि आम्ही विश्वास ठेवला आहे आणि जाणतो की, आपण देवाचे पवित्र पुरूष आपण आहात.”
योहान 6:66-69 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे ऐकून त्यांचे अनेक शिष्य मागे फिरले व त्यांना अनुसरले नाहीत. येशू आपल्या बारा शिष्यांना म्हणाले, “तुम्ही सुद्धा सोडून जाणार नाही ना?” त्यावर शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत. आम्ही विश्वास ठेवला आहे आणि परमेश्वराचे पवित्र ते तुम्हीच आहात हे ओळखले आहे.”
योहान 6:66-69 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. म्हणून येशू बारा शिष्यांना म्हणाला, “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?” शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत; आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात.”1
योहान 6:66-69 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्यामुळे त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याकडे आले नाहीत. म्हणूनच येशू बारा जणांना म्हणाला, “तुमचीही निघून जायची इच्छा आहे काय?” शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार? शाश्वत जीवन देणारी वचने आपल्याजवळ आहेत. आणि आता आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो आपणच आहात.”