योहान 6:16-21
योहान 6:16-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली सरोवराकडे गेले; आणि एका तारवात बसून सरोवराच्या दुसर्या बाजूस कफर्णहूमकडे जाऊ लागले. इतक्यात अंधार झाला होता आणि येशू त्यांच्याकडे आला नव्हता. आणि मोठा वारा सुटून सरोवर खवळू लागले होते. मग त्यांनी सुमारे सहा किलोमीटर वल्हवून गेल्यावर येशूला पाण्यावरून तारवाजवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. पण तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” म्हणून त्यास तारवात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांला जायचे होते त्याठिकाणी तारू किनाऱ्यास लावले.
योहान 6:16-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
संध्याकाळ झाल्यावर, त्यांचे शिष्य खाली सरोवराकडे गेले, ते मचव्यात बसले आणि सरोवरा पलीकडे कफर्णहूमास जाण्यास निघाले. रात्र झाली तरी येशू यद्यापि त्यांच्याकडे परतले नव्हते. परंतु वादळी वारा सुटला व लाटा खवळून वाहू लागल्या. ते तीन किंवा चार मैल अंतर वल्हवून गेले असतील, तोच त्यांना येशू होडीकडे पाण्यावरून चालत येताना दिसले, तेव्हा ते फार घाबरले. परंतु ते त्यांना म्हणाले, “मी आहे; भिऊ नका.” ते येशूंना होडीत घेण्यास तयार झाले आणि लागलीच ती होडी जेथे त्यांना जायचे होते तेथे किनार्यास पोहोचली.
योहान 6:16-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले, आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफर्णहूमास जाऊ लागले. एवढ्यात अंधार पडला, तोपर्यंत येशू त्यांच्याजवळ आला नव्हता. आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे कोस सव्वा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले; परंतु तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली; तेवढ्यात त्यांना जायचे होते त्या ठिकाणी मचवा किनार्यास लागला.
योहान 6:16-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य सरोवराकडे गेले. ते मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे कफर्णहूमला जाऊ लागले. अंधार पडला तोवर येशू त्यांच्याजवळ आला नव्हता. जोरदार वारा सुटून सरोवराचे पाणी खवळू लागले. मचवा सुमारे पाच-सहा किलोमीटर वल्हवून नेल्यावर त्यांनी येशूला पाण्यावरून मचव्यापर्यंत चालत येताना पाहिले आणि त्यांचा थरकाप उडाला. तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” त्यांनी आपणहून त्याला मचव्यात घेण्याची इच्छा दर्शवली. परंतु त्यांना जायचे होते त्या ठिकाणी मचवा लवकरच किनाऱ्याला लागला.