YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 6:1-6

योहान 6:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या गोष्टी झाल्यानंतर येशू गालीलच्या सरोवराच्या दुसर्‍या बाजूस गेला ज्याला तिबिर्य सरोवरसुद्धा म्हणतात. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी असलेल्यांवर तो जी चिन्हे करीत होता ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांबरोबर बसला. आता वल्हांडण हा यहूद्यांचा सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून व लोकांचा जमाव आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांस खायला भाकरी कोठून विकत आणणार?” हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत हे त्यास ठाऊक होते.

सामायिक करा
योहान 6 वाचा

योहान 6:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

काही वेळानंतर, येशू गालील समुद्रापलीकडे गेले. या समुद्राला (तिबिर्‍यास सरोवर) असेही म्हणत लोकांचा मोठा समुदाय त्यांच्यामागे चालला होता, कारण त्यांनी आजार्‍यांना अद्भुत चिन्हे करून बरे केलेले पाहिले होते. यानंतर येशू डोंगरावर त्यांच्या शिष्यांसह जाऊन बसले. यहूद्यांचा वल्हांडण सण आता जवळ आला होता. जेव्हा येशूंनी वर पाहिले व त्यांना एक मोठा जनसमुदाय आपल्याकडे येत असलेला दिसला. ते फिलिप्पाला म्हणाले, “या लोकांना खाण्यासाठी आपणास भाकरी कुठे विकत मिळतील?” ते केवळ त्याची परीक्षा पाहत होते, कारण आपण काय करणार आहोत हे त्यांनी मनात आधी ठरविले होते.

सामायिक करा
योहान 6 वाचा