योहान 5:6-9
योहान 5:6-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने त्यास पडलेले पाहिले व त्यास तसे पडून आता बराच काळ लोटला हे ओळखून त्यास म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” त्या आजारी मनुष्याने त्यास उत्तर दिले, “साहेब, पाणी हालविले जाते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझ्याजवळ कोणी नाही; आणि मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो.” येशू त्यास म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.” लगेच तो मनुष्य बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. तो दिवस शब्बाथ दिवस होता.
योहान 5:6-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी त्याला तेथे पडलेले पाहिले आणि तो तसाच स्थितीत बराच काळ पडून आहे, असे जाणून, त्याला विचारले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” “महाराज,” तो अपंग म्हणाला, “पाणी हालविल्यानंतर तळ्यात उतरण्यास मला मदत करेल असा कोणी नाही. मी प्रयत्न करून आत उतरण्याआधी दुसराच आत उतरलेला असतो.” तेव्हा येशू त्याला म्हणाले, “ऊठ आणि आपले अंथरुण उचलून चालू लाग.” त्याचक्षणी तो मनुष्य बरा झाला आणि आपले अंथरुण उचलून चालत गेला. ज्या दिवशी हे घडले तो शब्बाथ दिवस होता.
योहान 5:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” त्या दुखणेकर्याने त्याला उत्तर दिले, “महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही; मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्याआधी उतरतो.” येशू त्याला म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.” लगेचच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बाथ होता.
योहान 5:6-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे, हे ओळखून त्याला म्हटले, “तुझी बरे होण्याची इच्छा आहे काय?” त्या रुग्णाने त्याला उत्तर दिले, “महाराज, पाणी ढवळते तेव्हा मला तलावात सोडायला माझा कोणी माणूस नसतो. मी जातो न जातो तोच दुसरा कोणी तरी माझ्या आधी उतरतो.” येशू त्याला म्हणाला, “ऊठ, तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग.” लगेच तो माणूस बरा झाला व त्याचे अंथरुण उचलून चालू लागला. हे घडले तो दिवस साबाथ होता.