YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 5:21-29

योहान 5:21-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण पिता जसा मरण पावलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. पिता कोणाचा न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मरण पावलेले लोक देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्यास दिले. आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्यास दिला. त्याचे आश्चर्य करू नका; कारण जेव्हा कबरात असलेले सर्व त्याचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे, आणि ज्याने सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.

सामायिक करा
योहान 5 वाचा

योहान 5:21-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

कारण जसा पिता मेलेल्यास उठवून जीवन देतो, तसा पुत्रही त्याच्या मर्जीप्रमाणे ज्यांना पाहिजे त्यांना जीवन देतो. याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर सर्व न्याय करण्याचे काम त्याने पुत्राकडे सोपविले आहे, यासाठी की जसा पित्याचा तसा सर्वांनी पुत्राचाही सन्मान करावा, जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो, ज्याने पुत्राला पाठविले त्या पित्याचाही सन्मान करीत नाही. “मी तुम्हाला निश्चित सांगतो, जो कोणी माझे वचन ऐकतो आणि ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय होणार नाही, तर त्याने मरणातून पार होऊन जीवनात प्रवेश केला आहे. मी निश्चित सांगतो, अशी वेळ येत आहे आणि आलेलीच आहे की त्यावेळी मेलेले लोक परमेश्वराच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील, ते जिवंत राहतील. कारण ज्याप्रमाणे पित्यामध्ये जीवन आहे, त्याचप्रमाणे पुत्रामध्येही जीवन असावे अशी त्यांनी योजना केली आहे. आणि तो मानवपुत्र आहे म्हणून न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्यांना दिला आहे. “याविषयी आश्चर्य करू नका, कारण अशी वेळ येत आहे हे की, जे सर्व कबरेमध्ये आहेत ते त्यांची वाणी ऐकतील, आणि बाहेर येतील. ज्यांनी चांगली कर्मे केली आहेत ते सार्वकालिक जीवनासाठी उठतील, व ज्यांनी दुष्कर्मे केली आहेत ते दंड भोगण्यासाठी उठतील.

सामायिक करा
योहान 5 वाचा

योहान 5:21-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे; ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वत:चे जीवन असावे असे त्याने त्याला दिले; आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला. ह्याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरांतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.

सामायिक करा
योहान 5 वाचा

योहान 5:21-29 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो, तसा पुत्रही स्वतःच्या इच्छेनुसार मेलेल्यांना जिवंत करतो. पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचा सर्व अधिकार त्याने पुत्राकडे सोपवला आहे. ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने त्याला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही. मी तुम्हांला खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याला शाश्वत जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय केला जाणार नाही, त्याने मरणातून जीवनात प्रवेश केला आहे. मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. ज्याप्रमाणे पित्याच्या ठायी जीवन आहे, त्याचप्रमाणे पित्याने त्याच्या पुत्राच्या ठायीदेखील जीवन दिले आहे. त्याला न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. कारण तो मनुष्याचा पुत्र आहे. आश्चर्य मानू नका कारण अशी वेळ येत आहे की, थडग्यांतील सर्व मृत लोक पुत्राची वाणी ऐकतील आणि ते उठतील - ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी.

सामायिक करा
योहान 5 वाचा