योहान 5:14-15
योहान 5:14-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यानंतर तो येशूला परमेश्वराच्या भवनात भेटला तेव्हा तो त्यास म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.” त्या मनुष्याने जाऊन यहूद्यांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.”
योहान 5:14-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर येशूंना तो मनुष्य मंदिरात आढळला आणि येशूंनी त्याला सांगितले, “पाहा, तू आता बरा झाला आहेस. येथून पुढे पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.” मग त्या मनुष्याने यहूदी पुढार्यांकडे जाऊन ज्याने मला बरे केले तो येशू आहे असे सांगितले.
योहान 5:14-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस; आतापासून पाप करू नकोस; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.” त्या माणसाने जाऊन यहूद्यांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.”
योहान 5:14-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस. आतापासून तू पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.” त्या माणसाने जाऊन यहुदी लोकांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.”