योहान 4:35-38
योहान 4:35-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल, असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हास म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक गोळा करतो; यासाठी की पेरणाऱ्याने व कापणी करणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. ‘एक पेरतो आणि दुसरा कापतो’, अशी जी म्हण आहे ती या बाबतीत खरी आहे. ज्यासाठी तुम्ही कष्ट केले नाहीत ते कापायला मी तुम्हास पाठवले. दुसर्यांनी कष्ट केले होते व तुम्ही त्यांच्या कष्टात वाटेकरी झालेले आहात.”
योहान 4:35-38 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
‘चार महिन्यांचा अवधी कापणी करण्यासाठी आहे असे तुमचे म्हणणे आहे ना?’ तर मी तुम्हाला सांगतो, आपली नजर वर करून शेते पाहा! ती कापणीसाठी तयार आहेत. आता कापणार्याला मजुरी मिळत आहे व तो सार्वकालिक जीवनासाठी पीक साठवून ठेवत आहे; यासाठी की, पेरणार्याने व कापणार्यानेही एकत्रित मिळून आनंद करावा. ‘एक पेरतो व दुसरा कापणी करतो,’ अशी जी म्हण आहे ती खरी आहे. जेथे पेरणी केली नाही, तेथे कापणी करण्यासाठी मी तुम्हाला पाठविले; इतरांनी पेरणी करण्याचे कष्ट केले होते आणि त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ तुम्हाला मिळाले आहे.”
योहान 4:35-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल’ असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हांला म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो; ह्यासाठी की, पेरणार्याने व कापणी करणार्यानेही एकत्र आनंद करावा. ‘एक पेरतो व एक कापतो,’ अशी जी म्हण आहे ती ह्या बाबतीत खरी आहे. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापायला मी तुम्हांला पाठवले; दुसर्यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमांचे वाटेकरी झाला आहात.”
योहान 4:35-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल, असे तुम्ही म्हणता की नाही? परंतु मी तुम्हांला सांगतो, आपली नजर वर करून शेते पाहा. पीक तयार आहे. कापणीची वेळ येऊन ठेपली आहे. जो मनुष्य कापणी करतो, तो मजुरी मिळवतो व शाश्वत जीवनासाठी पीक साठवतो, ह्यासाठी की, पेरणारा व कापणारा हे दोघेही आनंदित व्हावेत. एक पेरतो व दुसरा कापतो, अशी जी म्हण आहे, ती ह्या बाबतीत खरी आहे. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते, ते कापायला मी तुम्हांला पाठवले. दुसऱ्यांनी श्रम केले आहेत व तुम्हांला त्यांच्या श्रमात सहभाग मिळत आहे.”