YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 4:11-15

योहान 4:11-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, पाणी काढायला आपल्याजवळ काही नाही व विहीर तर खोल आहे, मग आपल्याजवळ ते जिवंत पाणी कोठून? आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हास दिली, तो स्वतः, त्याचे पुत्र व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय?” येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्यास पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्यास कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्यास देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.” ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.”

सामायिक करा
योहान 4 वाचा

योहान 4:11-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“महाराज,” ती स्त्री म्हणाली, “परंतु आपल्याजवळ पाणी काढण्यासाठी पोहरा नाही आणि विहीर तर खूप खोल आहे. हे जिवंत पाणी आपणाकडे कुठून येणार? आमचा पिता याकोबाने आम्हाला ही विहीर दिली होती व ते स्वतः, त्यांची गुरे आणि त्याचे पुत्रही हे पाणी पीत असत, त्यांच्यापेक्षा आपण थोर आहात काय?” येशूंनी तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु जे पाणी मी देतो ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. खरोखर, जे पाणी मी त्यांना देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी जिवंत पाण्याचा झरा असे होईल.” ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला हे पाणी द्या, म्हणजे मला तहान लागणार नाही आणि सतत पाणी काढण्यासाठी येथे येण्याची गरजही पडणार नाही.”

सामायिक करा
योहान 4 वाचा

योहान 4:11-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून? आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हांला दिली; तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय?” येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.” ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.”

सामायिक करा
योहान 4 वाचा

योहान 4:11-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जीवनदायक पाणी आपल्याजवळ कुठून येणार? आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हांला दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे ह्याच विहिरीचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण थोर आहात काय?” येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल, त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्या ठायी शाश्‍वत जीवन देणाऱ्या पाण्याचा उसळता झरा होईल.” ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, ते पाणी मला द्या म्हणजे मला तहान लागणार नाही व पाणी काढायला मला येथवर यावे लागणार नाही.”

सामायिक करा
योहान 4 वाचा