योहान 21:6-11
योहान 21:6-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तो त्यांना म्हणाला, “तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल.” म्हणून त्यांनी टाकले आणि माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना आता ओढवेना. तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो “प्रभू आहे, प्रभू आहे” तेव्हा तो उघडा असल्यामुळे (त्याने बाहेरील वस्त्र, झगा, न घातल्यामुळे) त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली. आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत ओढीत आले कारण ते किनार्यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातावर होते. तेव्हा ते किनार्यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.” तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही.
योहान 21:6-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग त्यांनी म्हटले, “होडीच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला काही सापडतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा इतक्या मोठ्या संख्येने मासे मिळाले की त्यांना जाळे ओढणे अशक्य झाले. मग ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “ते प्रभू आहेत!” शिमोन पेत्राने, “ते प्रभू आहेत,” हे ऐकताच आपला अंगरखा कंबरेभोवती गुंडाळला, कारण त्याने तो काढून ठेवला होता आणि पाण्यात उडी मारली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले, कारण ते काठापासून दूर नव्हते, तर सुमारे शंभर मीटर अंतरावर होते. मग काठावर उतरल्यावर, त्यांनी कोळशाचा विस्तव पाहिला, त्यावर मासळी, व काही भाकरी ठेवल्या होत्या. येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीतून काही आणा.” शिमोन पेत्राने परत मचव्यावर चढून जाळे काठावर ओढून आणले. त्याने मोजल्याप्रमाणे त्यात एकशे त्रेपन्न मोठे मासे होते आणि इतके असूनही ते जाळे फाटले नव्हते.
योहान 21:6-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हांला सापडेल; म्हणून त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “हा प्रभूच आहे.” “प्रभू आहे” हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कंबरेला गुंडाळून घेतला, (कारण तो उघडा होता) आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत ओढत होडीतून आले, (कारण ते किनार्यापासून दूर नव्हते, सुमारे दोनशे हातांवर होते). मग किनार्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा.” शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्यावर ओढून आणले; तितके असतानाही जाळे फाटले नाही.
योहान 21:6-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याने त्यांना म्हटले, “मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हांला सापडतील”, त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, तो पेत्राला म्हणाला, “हा तर प्रभू आहे.” ‘प्रभू आहे’, हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घेऊन तो कमरेशी गुंडाळला, कारण तो उघडा होता आणि त्याने पाण्यात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे शंभर मीटर अंतरावर होते. किनाऱ्यावर उतरल्यानंतर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी तसेच काही भाकरी पाहिल्या. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आताच धरलेले काही मासे आणा.” शिमोन पेत्राने मचव्यावर चढून जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. त्यात एकशे त्रेपन्न मोठे मासे होते. असे असतानाही जाळे फाटले नाही.