योहान 21:3-4
योहान 21:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयला जातो.” ते त्यास म्हणतात, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते निघून तारवात चढले आणि त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही.
योहान 21:3-4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयास बाहेर जात आहे,” तेव्हा ते पेत्राला म्हणाले, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते बाहेर निघून होडीत बसले, परंतु त्या रात्री ते काहीही धरू शकले नाही. पहाटेच्या वेळी, येशू सरोवराच्या काठावर उभे होते, परंतु ते येशू आहेत हे शिष्यांना समजले नाही.
योहान 21:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते निघून मचव्यात बसले; पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. मग पहाट होत असता येशू समुद्रकिनार्यावर उभा होता; तरी तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते.
योहान 21:3-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांना एकही मासा मिळाला नाही. पहाट होत असता येशू सरोवराच्या काठावर उभा होता. तरी पण तो येशू आहे, हे शिष्यांनी ओळखले नव्हते.