योहान 21:24-25
योहान 21:24-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.
योहान 21:24-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो हा शिष्य ज्याने या सर्व गोष्टींविषयी साक्ष दिली आणि त्या लिहून ठेवल्या. त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. येशूंनी दुसरीही बहुत कृत्ये केलीत. मला वाटते, जर सर्व घटना लिहून काढल्या, तर इतकी पुस्तके होतील की ती या संपूर्ण जगात मावणार नाहीत.
योहान 21:24-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो व ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हांला माहीत आहे. येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एकेक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.
योहान 21:24-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो ह्या घटनांविषयी साक्ष देतो व ज्याने ह्या लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे. हे आम्हांला माहीत आहे. येशूने केलेली दुसरी पुष्कळ कृत्ये आहेत. ती सर्व लिहून ठेवली तर त्यांची पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.