योहान 21:20-23
योहान 21:20-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले. म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?”
योहान 21:20-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो त्यांच्यामागे येत होता असे त्याने पाहिले. भोजनाच्या वेळी येशूंच्या उराशी असता मागे वळून, “प्रभूजी, आपला घात कोण करणार आहे?” असे ज्याने विचारले होते तो हा शिष्य होता. पेत्राने त्याला पाहिल्यावर येशूंना विचारले, “प्रभूजी, याचे काय?” त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी पुन्हा येईपर्यंत त्याने जगावे, अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय? तुला माझ्यामागे आलेच पाहिजे.” या कारणाने, तो शिष्य मरणार नाही अशी अफवा विश्वासणार्यांमध्ये पसरली. परंतु तो मरणार नाही, असे ते म्हणाले नव्हते; येशू ख्रिस्त एवढेच म्हणाले होते, “मी येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असली, तर त्याचे तुला काय?”
योहान 21:20-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून “प्रभू, आपणाला धरून देणारा तो कोण आहे?” असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” येशूने त्याला म्हटले, “मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्यामागे ये.” ह्यावरून तो शिष्य मरणार नाही ही गोष्ट बंधुवर्गामध्ये पसरली; तरी ‘तो मरणार नाही’ असे येशूने त्याला म्हटले नव्हते; तर “मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय?” असे म्हटले होते.
योहान 21:20-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पेत्र मागे वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती त्याला त्याने मागे येताना पाहिले. भोजनाच्या वेळेस जो त्याच्या उराशी टेकला असता म्हणाला होता, ‘प्रभो, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, “प्रभो, ह्याचे काय?” येशूने त्याला म्हटले, “मी येईपर्यंत त्याने राहावे, अशी माझी इच्छा असली, तर तुला त्याचे काय? तू माझ्यामागे ये.” ह्यावरून तो शिष्य मरणार नाही, असा समज बंधुवर्गामध्ये पसरला. तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, पण ‘मी येईपर्यंत त्याने राहावे, अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय’, असे म्हटले होते.