YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 21:1-10

योहान 21:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि या यानंतर पुन्हा तिबिर्याच्या सरोवराजवळ येशूने शिष्यांना स्वतःस प्रकट झाला; आणि अशाप्रकारे स्वतःस प्रकट केले. शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालील प्रांतातील काना नगरातील नथनेल व जब्दीचे पुत्र आणि त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे जण हे बरोबर होते. शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयला जातो.” ते त्यास म्हणतात, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते निघून तारवात चढले आणि त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्‍याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?” ते त्यास म्हणाले, “नाही.” आणि तो त्यांना म्हणाला, “तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल.” म्हणून त्यांनी टाकले आणि माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना आता ओढवेना. तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो “प्रभू आहे, प्रभू आहे” तेव्हा तो उघडा असल्यामुळे (त्याने बाहेरील वस्त्र, झगा, न घातल्यामुळे) त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली. आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत ओढीत आले कारण ते किनार्‍यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातावर होते. तेव्हा ते किनार्‍यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.”

सामायिक करा
योहान 21 वाचा

योहान 21:1-10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यानंतर येशू पुन्हा तिबिर्‍यास सरोवराजवळ शिष्यांस प्रगट झाले, ते असे घडले: शिमोन पेत्र, दिदुम म्हणून ओळखला जाणारा थोमा गालीलातील काना येथील नाथानाएल, जब्दीचे पुत्र आणि दुसरे दोन शिष्य एकत्रित होते. शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयास बाहेर जात आहे,” तेव्हा ते पेत्राला म्हणाले, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते बाहेर निघून होडीत बसले, परंतु त्या रात्री ते काहीही धरू शकले नाही. पहाटेच्या वेळी, येशू सरोवराच्या काठावर उभे होते, परंतु ते येशू आहेत हे शिष्यांना समजले नाही. येशूंनी हाक मारून विचारले, “मित्रांनो, तुमच्याजवळ काही मासे आहेत काय?” “नाही,” त्यांनी उत्तर दिले. मग त्यांनी म्हटले, “होडीच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला काही सापडतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा इतक्या मोठ्या संख्येने मासे मिळाले की त्यांना जाळे ओढणे अशक्य झाले. मग ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “ते प्रभू आहेत!” शिमोन पेत्राने, “ते प्रभू आहेत,” हे ऐकताच आपला अंगरखा कंबरेभोवती गुंडाळला, कारण त्याने तो काढून ठेवला होता आणि पाण्यात उडी मारली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले, कारण ते काठापासून दूर नव्हते, तर सुमारे शंभर मीटर अंतरावर होते. मग काठावर उतरल्यावर, त्यांनी कोळशाचा विस्तव पाहिला, त्यावर मासळी, व काही भाकरी ठेवल्या होत्या. येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीतून काही आणा.”

सामायिक करा
योहान 21 वाचा

योहान 21:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्यानंतर तिबिर्याच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रकट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालीलातील काना येथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोघे जण हे एकत्र जमले असता, शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते निघून मचव्यात बसले; पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. मग पहाट होत असता येशू समुद्रकिनार्‍यावर उभा होता; तरी तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खायला आहे काय?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “नाही.” त्याने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हांला सापडेल; म्हणून त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “हा प्रभूच आहे.” “प्रभू आहे” हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कंबरेला गुंडाळून घेतला, (कारण तो उघडा होता) आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत ओढत होडीतून आले, (कारण ते किनार्‍यापासून दूर नव्हते, सुमारे दोनशे हातांवर होते). मग किनार्‍यावर उतरल्यावर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा.”

सामायिक करा
योहान 21 वाचा

योहान 21:1-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्या घटनांनंतर येशूने पुन्हा एकदा तिबिर्या सरोवराजवळ शिष्यांसमोर स्वतःला अशा प्रकारे प्रकट केले: शिमोन पेत्र, ज्याला दिदुम म्हणजे जुळा म्हणत तो थोमा, गालीलमधील काना येथील नथनेल, जब्दीचे मुलगे व येशूचे दुसरे दोघे शिष्य हे एकत्र जमले होते. शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांना एकही मासा मिळाला नाही. पहाट होत असता येशू सरोवराच्या काठावर उभा होता. तरी पण तो येशू आहे, हे शिष्यांनी ओळखले नव्हते. येशूने त्यांना विचारले, “मुलांनो, तुमच्याकडे मासे नाहीत काय?” त्यांनी “नाही” असे त्याला उत्तर दिले. त्याने त्यांना म्हटले, “मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हांला सापडतील”, त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, तो पेत्राला म्हणाला, “हा तर प्रभू आहे.” ‘प्रभू आहे’, हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घेऊन तो कमरेशी गुंडाळला, कारण तो उघडा होता आणि त्याने पाण्यात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे शंभर मीटर अंतरावर होते. किनाऱ्यावर उतरल्यानंतर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी तसेच काही भाकरी पाहिल्या. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आताच धरलेले काही मासे आणा.”

सामायिक करा
योहान 21 वाचा