YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 20:11-15

योहान 20:11-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पण इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि ती रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले; आणि जेथे येशूचे शरीर आधी ठेवलेले होते तेथे ते शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक डोक्याकडील बाजूस आणि एक पायांकडील बाजूस बसलेले दिसले. आणि ते तिला म्हणाले, “मुली, तू का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्यास कोठे ठेवले हे मला माहीत नाही.” असे बोलून ती मागे वळली आणि तो तिला येशू उभा असलेला दिसला; पण तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “मुली, तू का रडतेस? तू कोणाला शोधतेस?” तो माळी आहे असे समजून त्यास म्हणाली, “साहेब, तू त्यास येथून नेले असेल तर कोठे ठेवलेस ते मला सांग म्हणजे मी त्यास घेऊन जाईन.”

सामायिक करा
योहान 20 वाचा

योहान 20:11-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परंतु मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली. ती रडत असताना, तिने ओणवून कबरेच्या आत डोकावून पाहिले. आणि तिला, जेथे येशूंचे शरीर ठेवले होते तेथे, एक उशाशी व दुसरा पायथ्याशी शुभ्र झगा परिधान केलेले दोन देवदूत दिसले. त्यांनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस?” तिने उत्तर दिले, “कारण त्यांनी माझ्या प्रभुला काढून नेले आहे,” आणि “त्यांनी त्यांचे शरीर कोठे ठेवले आहे, हे मला माहीत नाही.” असे असताना, तिने मागे वळून पाहिले, तेव्हा येशू तिथे उभे होते, पण ते येशू आहेत हे तिने ओळखले नाही. येशूंनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाचा शोध करत आहेस?” तो माळी असावा, असे समजून ती म्हणाली, “महाराज, तुम्ही त्यांना नेले असेल, तर त्याला तुम्ही कोठे ठेवले ते मला सांगा, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईन.”

सामायिक करा
योहान 20 वाचा

योहान 20:11-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले. आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ, बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, “बाई, का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.” असे बोलून ती पाठमोरी फिरली, तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला; परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस?” तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.”

सामायिक करा
योहान 20 वाचा

योहान 20:11-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

इकडे मरिया कबरीजवळ रडत उभी राहिली होती. रडतारडता तिने वाकून कबरीत पाहिले. जेथे येशूचे शरीर ठेवले होते, तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व दुसरा पायथ्याशी बसलेले तिला दिसले. त्यांनी तिला विचारले, “बाई, का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कुठे ठेवले ते मला ठाऊक नाही!” असे बोलून ती पाठमोरी फिरली तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे, हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “बाई, का रडतेस? कोणाला शोधत आहेस?” तो माळी आहे, असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असलेस, तर त्याला कुठे ठेवलेस, हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.”

सामायिक करा
योहान 20 वाचा