योहान 20:1-2
योहान 20:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आठवड्याच्या पहिल्या दिवशी, पहाटेस अंधारातच, मग्दालीया नगराची मरीया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्या दुसर्या शिष्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आणि त्यास कोठे ठेवले हे आम्हास माहीत नाही.”
योहान 20:1-2 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटेस, अंधार असताना, मरीया मग्दालिया कबरेकडे गेली आणि प्रवेशद्वारावरून मोठी धोंड बाजूला लोटलेली आहे, असे तिने पाहिले. तेव्हा धावतच ती शिमोन पेत्र व दुसरा शिष्य, ज्यावर येशूंची प्रीती होती, त्यांना येऊन म्हणाली, “त्यांनी प्रभुला कबरेतून काढून नेले आहे आणि त्यांना कोठे ठेवले आहे ते आम्हाला माहीत नाही!”
योहान 20:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरीया मग्दालीया कबरेजवळ आली, आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही.”
योहान 20:1-2 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी पहाटेस अंधारातच मरिया मग्दालिया कबरीजवळ गेली आणि कबरीवरून शिळा बाजूला सारलेली आहे, असे तिने पाहिले. शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत जाऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरीतून नेले व त्याला कुठे ठेवले, हे आम्हांला ठाऊक नाही.”