YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 19:14-18

योहान 19:14-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे सहावा तास होता. तेव्हा त्याने यहूद्यांना म्हटले, “पाहा, तुमचा राजा!” ह्यावरून ते ओरडले, “त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा!” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसरावाचून आम्हांला कोणी राजा नाही.” मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले, आणि तो आपला वधस्तंभ स्वत: वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसर्‍या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसर्‍याला दुसर्‍या बाजूस आणि येशूला मध्ये, असे वधस्तंभावर खिळले.

सामायिक करा
योहान 19 वाचा

योहान 19:14-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते आणि तो यहूद्यांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!” यावरुन ते ओरडले, “ह्याला संपवून टाका, त्यास वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हास कैसराशिवाय राजा नाही.” मग, त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्यांच्या हाती दिले. तेव्हा त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत ‘कवटीचे’ स्थान म्हटलेल्या जागी गेला. या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसर्‍या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभांवर खिळले.

सामायिक करा
योहान 19 वाचा

योहान 19:14-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून; ती दुपारची वेळ होती. “हा पाहा तुमचा राजा,” पिलात यहूदीयांना म्हणाला. परंतु लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला येथून न्या! त्याला येथून न्या! त्याला क्रूसावर खिळा!” तेव्हा पिलाताने विचारले, “तुमच्या राजाला मी क्रूसावर खिळावे काय?” त्यावर मुख्य याजक म्हणाले, “कैसराशिवाय आम्हाला दुसरा राजा नाही.” सरतेशेवटी पिलाताने येशूंना क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले. सैनिकांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले. मग आपला स्वतःचा क्रूस वाहवून, ते कवटी म्हटलेल्या जागी आले, ज्याला अरेमिक भाषेमध्ये गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांना आणि त्यांच्याबरोबर इतर दोघांना—त्यांच्या दोन्ही बाजूला एक एक व येशूंना त्यांच्यामध्ये असे क्रूसावर खिळले.

सामायिक करा
योहान 19 वाचा

योहान 19:14-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तो ओलांडण सणाच्या तयारीचा दिवस होता व दुपारची वेळ झाली होती. पिलात लोकांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!” ते ओरडले, “त्याला ठार करा, ठार करा, त्याला क्रुसावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला क्रुसावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसरवाचून आमचा कोणी राजा नाही!” त्यानंतर पिलातने येशूला क्रुसावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले. त्यांनी येशूला ताब्यात घेतले. तो त्याचा क्रूस स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला हिब्रू भाषेत गोलगोथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये, असे क्रुसावर खिळले.

सामायिक करा
योहान 19 वाचा