योहान 18:37-38
योहान 18:37-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून पिलात त्यास म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” पिलात त्यास म्हणाला, “सत्य काय आहे?” आणि हे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.
योहान 18:37-38 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यावरून पिलात त्याला म्हणाला, “मग तू राजा आहेस!” येशूंनी उत्तर दिले, “तू म्हणतो मी राजा आहे. खरेतर सत्याची साक्ष देण्यासाठीच माझा जन्म झाला व मी या जगात आलो. जे सत्याच्या बाजूचे आहेत, ते माझे ऐकतात.” पिलाताने उलट विचारले, “सत्य काय आहे?” मग तो पुन्हा यहूदी जेथे जमले होते तेथे बाहेर गेला व त्यांना म्हणाला, “त्याच्यावर आरोप करण्यासाठी मला कसलाही आधार सापडत नाही.
योहान 18:37-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” पिलात त्याला म्हणाला, “सत्य काय आहे?” असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, “ह्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही.
योहान 18:37-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे, असे आपण म्हणता. सत्याविषयी साक्ष द्यावी म्हणून माझा जन्म झाला आहे व ह्याकरता मी जगात आलो आहे. जो कोणी सत्याची बाजू घेतो तो माझी वाणी ऐकतो.” पिलातने त्याला विचारले, “सत्य काय आहे?” नंतर तो पुन्हा बाहेर जाऊन यहुदी लोकांना म्हणाला, “मला ह्याच्यात काहीच दोष सापडत नाही.