योहान 18:25-27
योहान 18:25-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला इतर लोक म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” तो नाकारून बोलला, “मी नाही.” ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासांपैकी होता, तो त्याला म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?” पेत्राने पुन्हा नाकारले; आणि लगेचच कोंबडा आरवला.
योहान 18:25-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता; त्यास इतर म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” त्याने नाकारले व म्हटले, “मी नाही.” पेत्राने ज्याचा कान कापला होता त्याचा नातलग असलेला, महायाजकाच्या दासांपैकी एक होता, तो त्यास म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?” पेत्राने पुन्हा नाकारले आणि, लागलाच, कोंबडा आरवला.
योहान 18:25-27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दरम्यान, इकडे शिमोन पेत्र अजूनही शेकोटीजवळ शेकत उभा असताना, त्यांनी त्याला विचारले, “तू खरोखर त्यांच्या शिष्यांपैकीच एक नाहीस का आहेस ना?” पेत्र नाकारून म्हणाला, “मी तो नाही.” परंतु ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग, प्रमुख याजकाच्या दासांपैकी एक होता. त्याने पेत्राला विचारले, “मी तुला येशूंबरोबर बागेत पाहिले नाही का?” पेत्राने पुन्हा नकार दिला आणि तेवढ्यात कोंबडा आरवला.
योहान 18:25-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शिमोन पेत्र अजूनही शेकत उभा राहिला होता. त्याच्याबरोबर शेकत उभ्या असलेल्या लोकांनी त्याला विचारले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” परंतु तो म्हणाला, “मी नाही.” ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग उच्च याजकांच्या दासांपैकी होता. तो त्याला म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?” पेत्राने पुन्हा नाकारले आणि लगेच कोंबडा आरवला!