योहान 18:24-40
योहान 18:24-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे बांधलेलेच पाठवले. शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला इतर लोक म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” तो नाकारून बोलला, “मी नाही.” ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासांपैकी होता, तो त्याला म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?” पेत्राने पुन्हा नाकारले; आणि लगेचच कोंबडा आरवला. नंतर त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यात नेले, तेव्हा सकाळ होती आणि आपणांस विटाळ होऊ नये, वल्हांडणाचे भोजन करता यावे, म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत. ह्यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही ह्या माणसावर काय आरोप ठेवता?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते.” पिलाताने त्यांना म्हटले, “त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहूदी त्याला म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. तेव्हा पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः होऊन हे म्हणता किंवा दुसर्यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले?” पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले; तू काय केलेस?” येशूने उत्तर दिले, “माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.” ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” पिलात त्याला म्हणाला, “सत्य काय आहे?” असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, “ह्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही. पण वल्हांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे; म्हणून मी तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?” तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा.” बरब्बा हा एक लुटारू होता.
योहान 18:24-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा हन्नाने त्यास महायाजक कयफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले. शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता; त्यास इतर म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” त्याने नाकारले व म्हटले, “मी नाही.” पेत्राने ज्याचा कान कापला होता त्याचा नातलग असलेला, महायाजकाच्या दासांपैकी एक होता, तो त्यास म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?” पेत्राने पुन्हा नाकारले आणि, लागलाच, कोंबडा आरवला. तेव्हा त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यांत नेले; तेव्हा सकाळ होती आणि आपण अशुद्ध होऊ नये, पण वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यांत गेले नाहीत. यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही या मनुष्यावर काय आरोप ठेवता?” त्यांनी त्यास उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्यास आपल्या हाती दिले नसते.” पिलाताने त्यांना म्हटले, “त्याला तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहूदी अधिकारी त्यास म्हणाले, “आम्हास कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवितांना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. म्हणून पिलात पुन्हा सरकारवाड्यांत गेला; आणि त्याने येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः हे म्हणता किंवा दुसर्यांनी आपणाला माझ्याविषयी हे सांगितले?” पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले; तू काय केले.” येशूने उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर यहूद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; पण माझे राज्य येथले नाही.” म्हणून पिलात त्यास म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” पिलात त्यास म्हणाला, “सत्य काय आहे?” आणि हे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही. पण तुमच्यासाठी वल्हांडण सणांत मी एकाला सोडावे अशी तुमच्यात रीत आहे; तर तुमच्यासाठी मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?” तेव्हा पुन्हा ते ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा” आता बरब्बा हा एक लुटारू होता.
योहान 18:24-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग हन्नाने येशूंना बांधलेल्या अवस्थेतच महायाजक कयफा याजकडे पाठविले. दरम्यान, इकडे शिमोन पेत्र अजूनही शेकोटीजवळ शेकत उभा असताना त्यांनी त्याला विचारले, “तू खरोखर त्यांच्या शिष्यांपैकीच एक नाहीस का आहेस ना?” पेत्र नाकारून म्हणाला, “मी तो नाही.” परंतु ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग, महायाजकाच्या दासांपैकी एक होता. त्याने पेत्राला विचारले, “मी तुला येशूंबरोबर बागेत पाहिले नाही का?” पेत्राने पुन्हा नकार दिला आणि तेवढ्यात कोंबडा आरवला. मग यहूदी पुढार्यांनी येशूंना कयफाकडून रोमी राज्यपालाच्या राजवाड्यात नेले. तोपर्यंत पहाट झाली होती आणि आपण नियमशास्त्रानुसार अशुद्ध होऊ नये आणि आपल्याला वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः राजवाड्यात गेले नाहीत. तेव्हा पिलात त्यांच्याकडे बाहेर आला आणि त्याने त्यांना विचारले, “या मनुष्याविरुद्ध तुमचे काय आरोप आहेत?” पिलाताला उलट निरोप देत ते म्हणाले, “तो गुन्हेगार नसता तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केलेच नसते!” पिलात त्यांना म्हणाला, “त्याला घेऊन जा आणि तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” ते विरोध करून म्हणाले, “मृत्युदंड देण्याचा अधिकार आम्हाला नाही.” आपण कोणत्या प्रकारे मरणार असे जे येशूंनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. मग पिलात राजवाड्यामध्ये परतला आणि त्याने येशूंना आपल्यापुढे बोलावून विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” “ही तुमची स्वतःची कल्पना आहे की, इतरजण माझ्याबद्दल तुमच्याजवळ असे बोलले?” येशूंनी विचारले. तेव्हा प्रत्युत्तर करीत पिलात म्हणाला, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनीच तुला माझ्या स्वाधीन केले नाही का? तू काय केले?” मग येशूंनी उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. जर असते तर, यहूदी पुढार्यांनी मला अटक करू नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु आता माझे राज्य दुसर्या ठिकाणचे आहे.” यावरून पिलात त्याला म्हणाला, “मग तू राजा आहेस!” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता मी राजा आहे. खरेतर सत्याची साक्ष देण्यासाठीच माझा जन्म झाला व मी या जगात आलो. जे सत्याच्या बाजूचे आहेत, ते माझे ऐकतात.” पिलाताने उलट विचारले, “सत्य काय आहे?” मग तो पुन्हा यहूदी जिथे जमले होते तिथे बाहेर गेला व त्यांना म्हणाला, “त्याच्यावर आरोप करण्यासाठी मला कसलाही आधार सापडत नाही. परंतु वल्हांडण सणाच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी एका कैद्याला सोडावे अशी तुमची रीत आहे. तर मी या ‘यहूद्यांच्या राजाला’ सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?” ते ओरडले, “नाही, त्याला नको! आम्हाला बरब्बा हवा आहे!” बरब्बाने तर बंडात भाग घेतला होता.
योहान 18:24-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे बांधलेलेच पाठवले. शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला इतर लोक म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” तो नाकारून बोलला, “मी नाही.” ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासांपैकी होता, तो त्याला म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?” पेत्राने पुन्हा नाकारले; आणि लगेचच कोंबडा आरवला. नंतर त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यात नेले, तेव्हा सकाळ होती आणि आपणांस विटाळ होऊ नये, वल्हांडणाचे भोजन करता यावे, म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत. ह्यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही ह्या माणसावर काय आरोप ठेवता?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते.” पिलाताने त्यांना म्हटले, “त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहूदी त्याला म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. तेव्हा पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः होऊन हे म्हणता किंवा दुसर्यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले?” पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले; तू काय केलेस?” येशूने उत्तर दिले, “माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.” ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” पिलात त्याला म्हणाला, “सत्य काय आहे?” असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, “ह्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही. पण वल्हांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे; म्हणून मी तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?” तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा.” बरब्बा हा एक लुटारू होता.
योहान 18:24-40 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा हन्नाने त्याला उच्च याजक कयफा ह्यांच्याकडे बांधलेलेच पाठवले. शिमोन पेत्र अजूनही शेकत उभा राहिला होता. त्याच्याबरोबर शेकत उभ्या असलेल्या लोकांनी त्याला विचारले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” परंतु तो म्हणाला, “मी नाही.” ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग उच्च याजकांच्या दासांपैकी होता. तो त्याला म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?” पेत्राने पुन्हा नाकारले आणि लगेच कोंबडा आरवला! दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यात नेले. त्यांना विटाळ होऊ नये व त्यांना ओलांडण सणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत. पिलात स्वतः त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही ह्या माणसावर कोणता आरोप ठेवता?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “हा गुन्हेगार नसता, तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केले नसते.” पिलात त्यांना म्हणाला, “त्याला नेऊन तुम्हीच तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहुदी त्याला म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “आपण स्वतःहून हे म्हणता की, दुसऱ्यांनी आपल्याला माझ्याविषयी हे सांगितले?” पिलातने उत्तर दिले, “मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस?” येशूने उत्तर दिले, “माझे राज्य ह्या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते, तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु माझे राज्य येथले नाही.” तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे, असे आपण म्हणता. सत्याविषयी साक्ष द्यावी म्हणून माझा जन्म झाला आहे व ह्याकरता मी जगात आलो आहे. जो कोणी सत्याची बाजू घेतो तो माझी वाणी ऐकतो.” पिलातने त्याला विचारले, “सत्य काय आहे?” नंतर तो पुन्हा बाहेर जाऊन यहुदी लोकांना म्हणाला, “मला ह्याच्यात काहीच दोष सापडत नाही. पण ओलांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे तर मग मी तुमच्यासाठी यहुदी लोकांच्या राजाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे काय?” तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, बरब्बाला सोडा.” बरब्बा हा एक लुटारू होता.