योहान 18:10-11
योहान 18:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा शिमोन पेत्राजवळ तलवार असल्याने त्याने ती उपसली व महायाजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. तेव्हा येशू पेत्राला म्हणाला, “तरवार म्यानात घाल. पित्याने मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय?”
योहान 18:10-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा शिमोन पेत्राजवळ तरवार होती, ती तरवार उपसून त्याने प्रमुख याजकाच्या दासावर वार केला व त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. येशूंनी पेत्रास आज्ञा केली, “तुझी तरवार म्यानात घाल! पित्याने मला दिलेल्या प्याल्यातून मी पिऊ नये काय?”
योहान 18:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शिमोन पेत्राजवळ तलवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला; त्या दासाचे नाव मल्ख होते. येशू पेत्राला म्हणाला, “तलवार म्यानात घाल; पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय?”
योहान 18:10-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शिमोन पेत्राजवळ तलवार होती. ती त्याने उपसून उच्च याजकांच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. येशू पेत्राला म्हणाला, “तलवार म्यानात घाल. पित्याने जो दुःखाचा प्याला मला दिला आहे, तो मी पिऊ नये काय?”