YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 18:1-18

योहान 18:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला; तेथे बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणार्‍या यहूदालाही ठाऊक होती; कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परूशी ह्यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहूदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधता?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” येशू त्यांना म्हणाला, “मीच तो आहे.” त्याला धरून देणारा यहूदाही त्यांच्याबरोबर उभा होता. “मीच तो आहे” असे म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्याने त्यांना पुन्हा विचारले, “कोणाला शोधता?” ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.” येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे असे मी तुम्हांला सांगितले; तुम्ही मला शोधत असाल तर ह्यांना जाऊ द्या.” “जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरवला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्राजवळ तलवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला; त्या दासाचे नाव मल्ख होते. येशू पेत्राला म्हणाला, “तलवार म्यानात घाल; पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय?” मग सैनिकांची तुकडी, हजारांचा सरदार व यहूद्यांचे कामदार ह्यांनी येशूला धरून बांधले. त्यांनी त्याला प्रथम हन्नाकडे नेले; कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी ह्याच कयफाने यहूद्यांना मसलत दिली होती. पेत्र येशूला नाकारतो शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागेमागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला; पण पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ह्यावरून ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, “तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस काय?” त्याने म्हटले, “मी नाही.” थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते; आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता.

सामायिक करा
योहान 18 वाचा

योहान 18:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा त्यास धरून देणाऱ्या यहूदालाही माहीत होती कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक लोक व परूशी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर, दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन यहूदा तेथे आला. येशू आपणावर जे काही येणार हे सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधत आहात?” त्यांनी त्यास उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” तो त्यांना म्हणाला, “तो मी आहे.” आणि ज्या यहूदाने त्यास धरून दिले देखील त्यांच्याबरोबर उभा होता, “तो मीच आहे,” असे म्हणताच ते मागे सरकून जाऊन जमिनीवर पडले. मग त्याने त्यांना पुन्हा विचारले, “तुम्ही कोणाला शोधता?” आणि ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.” येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे; असे मी तुम्हास सांगितले, तुम्ही मला शोधीत असला तर यांना जाऊ द्या.” “जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरविला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. तेव्हा शिमोन पेत्राजवळ तलवार असल्याने त्याने ती उपसली व महायाजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. तेव्हा येशू पेत्राला म्हणाला, “तरवार म्यानात घाल. पित्याने मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय?” मग सैनिकांची तुकडी व हजारांचा सरदार आणि यहूद्यांचे अधिकारी हे येशूला धरून बांधले. आणि त्यास प्रथम हन्नाकडे नेले कारण, त्या वर्षी महायाजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता, एका मनुष्याने लोकांसाठी मरावे हे फायद्याचे आहे. अशी मसलत यहूद्यास याच कयफाने दिली होती. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे चालले; तो शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता आणि येशूबरोबर महायाजकाच्या वाड्यात गेला. पण पेत्र बाहेर, दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. यावरुन ती तरूण द्वारपालिका होती ती पेत्राला म्हणाली, “तूही या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?” तो म्हणाला, “मी नाही.” थंडी असल्यामुळे दास व कामदार कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि पेत्र पण त्यांच्याबरोबर शेकत उभा होता.

सामायिक करा
योहान 18 वाचा

योहान 18:1-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यांची प्रार्थना आटोपल्यावर, येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेले. दुसर्‍या बाजूला एक बाग होती, ते व त्यांचे शिष्य तिथे गेले. आता यहूदा, ज्याने त्यांचा विश्वासघात केला, त्याला ही जागा माहीत होती, कारण येशू आपल्या शिष्यांना बर्‍याच वेळा तिथे भेटत होते. तेव्हा सैनिकांची एक तुकडी, महायाजक आणि परूश्यांकडील अधिकाऱ्यांना वाट दाखवित यहूदाह त्यांना बागेत घेऊन आला. त्यांच्याजवळ मशाली, कंदिले व हत्यारे होती. येशू, जे सर्व आपल्यासोबत घडणार होते ते पूर्णपणे जाणून होते, त्यांनी बाहेर जाऊन त्यांना विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?” त्यावर त्यांनी उत्तर दिले, “नासरेथकर येशू.” तेव्हा येशू म्हणाले, “तो मी आहे,” आणि विश्वासघात करणारा यहूदाही त्यांच्याबरोबर तिथे उभा होता. जेव्हा येशूने म्हटले, “मी तो आहे,” तेव्हा ते मागे सरकून भूमीवर पडले. त्यांना पुन्हा विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?” त्यांनी म्हटले, “नासरेथकर येशू.” येशू म्हणाले, “तो मी आहे असे मी तुम्हाला सांगितले आहेच, आणि जर तुम्ही मला शोधत आहात, तर या माणसांना जाऊ द्यावे. जे तुम्ही मला दिले आहेत त्यातून मी एकही हरविला नाही,” हे शब्द त्यांनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. तेव्हा शिमोन पेत्राजवळ तरवार होती, ती तरवार उपसून त्याने महायाजकाच्या दासावर वार केला व त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. येशूंनी पेत्रास आज्ञा केली, “तुझी तलवार म्यानात घाल! पित्याने मला दिलेल्या प्याल्यातून मी पिऊ नये काय?” मग यहूदी अधिकार्‍यांनी, सैनिकांनी व त्यांच्या सेनापतींनी येशूंना अटक केली. त्यांना बंदी बनविले. प्रथम त्यांनी येशूंना त्या वर्षाचा महायाजक कयफाचा सासरा हन्नाकडे नेले. याच कयफाने यहूदी पुढार्‍यांसोबत अशी मसलत केली होती की, लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे हिताचे आहे. शिमोन पेत्र आणि आणखी एक शिष्य येशूंच्या मागे आले. कारण हा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा असल्यामुळे, त्याने येशूंबरोबर महायाजकाच्या अंगणात प्रवेश केला. परंतु पेत्राला बाहेर दाराजवळ थांबावे लागले. तो दुसरा शिष्य, ज्याला मुख्य याजकाची ओळख होती, तो परत आला व दारावर राखण ठेवणार्‍या दासीशी बोलला व त्यांनी पेत्राला आत आणले. मग त्या दासीने पेत्राला विचारले, “तू खात्रीने या माणसाच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?” त्याने उत्तर दिले, “मी नाही.” थंडी पडल्यामुळे शिपाई व वाड्यातील दास ऊब मिळावी म्हणून शेकोटी पेटवून त्याच्याभोवती शेकत उभे राहिले. पेत्रसुद्धा त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला.

सामायिक करा
योहान 18 वाचा

योहान 18:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला; तेथे बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणार्‍या यहूदालाही ठाऊक होती; कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परूशी ह्यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहूदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधता?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” येशू त्यांना म्हणाला, “मीच तो आहे.” त्याला धरून देणारा यहूदाही त्यांच्याबरोबर उभा होता. “मीच तो आहे” असे म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्याने त्यांना पुन्हा विचारले, “कोणाला शोधता?” ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.” येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे असे मी तुम्हांला सांगितले; तुम्ही मला शोधत असाल तर ह्यांना जाऊ द्या.” “जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरवला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्राजवळ तलवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला; त्या दासाचे नाव मल्ख होते. येशू पेत्राला म्हणाला, “तलवार म्यानात घाल; पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय?” मग सैनिकांची तुकडी, हजारांचा सरदार व यहूद्यांचे कामदार ह्यांनी येशूला धरून बांधले. त्यांनी त्याला प्रथम हन्नाकडे नेले; कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी ह्याच कयफाने यहूद्यांना मसलत दिली होती. पेत्र येशूला नाकारतो शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागेमागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला; पण पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ह्यावरून ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, “तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस काय?” त्याने म्हटले, “मी नाही.” थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते; आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता.

सामायिक करा
योहान 18 वाचा

योहान 18:1-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्या प्रार्थनेनंतर येशू त्याच्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडील बागेत गेला. ही जागा त्याचा विश्‍वासघात करणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती. कारण येशू त्याच्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी आणि मुख्य याजक व परुशी ह्यांच्याकडच्या रक्षकांसह यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. त्याच्या बाबतीत घडणाऱ्या सर्व गोष्टी जाणून असल्यामुळे, येशू बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधत आहात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” तो त्यांना म्हणाला, “तो मी आहे.” त्याला धरून देणारा यहुदा इस्कर्योत त्यांच्याबरोबर तेथे उभा होता. ‘तो मी आहे’, असे येशूने म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा येशूने त्यांना पुन्हा विचारले, “तुम्ही कोणाला शोधत आहात?” ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.” येशू म्हणाला, “तो मी आहे, असे मी तुम्हांला सांगितले. तुम्ही मला शोधत असाल तर ह्यांना जाऊ द्या.” ‘तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरवला नाही’, हे त्याचे वचन पूर्ण व्हावे, म्हणून तो हे बोलला. शिमोन पेत्राजवळ तलवार होती. ती त्याने उपसून उच्च याजकांच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. येशू पेत्राला म्हणाला, “तलवार म्यानात घाल. पित्याने जो दुःखाचा प्याला मला दिला आहे, तो मी पिऊ नये काय?” त्यानंतर सैनिकांची तुकडी, तिचे अधिकारी व यहुदी अधिकाऱ्यांनी पाठवलेले रक्षक ह्यांनी येशूला धरून बांधले. त्यांनी त्याला प्रथम हन्‍नाकडे नेले. त्या वर्षी उच्च याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांसाठी मरावे, हे हिताचे आहे, असा ह्याच कयफाने यहुदी लोकांना स्रा दिला होता. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे गेले. तो शिष्य उच्च याजकांच्या ओळखीचा होता म्हणून तो येशूबरोबर उच्च याजकांच्या वाड्यात गेला. पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता म्हणून जो दुसरा शिष्य उच्च याजकांच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, “तू त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस ना?” त्याने म्हटले, “मी नाही.” थंडी असल्यामुळे दास व रक्षक हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते. त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला.

सामायिक करा
योहान 18 वाचा