योहान 17:14-19
योहान 17:14-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे. आणि त्यांनीही सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला पवित्र करतो.
योहान 17:14-19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी त्यांना आपले वचन सांगितले आहे आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत. आपण त्यांना जगातून काढून घ्यावे यासाठी मी प्रार्थना करीत नाही, परंतु आपण त्यांचे दुष्टापासून रक्षण करावे. जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.” सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे. जसे आपण मला जगात पाठविले, तसे मीही त्यांना जगात पाठविले आहे. त्यांनी देखील खरोखर पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतःला पवित्र करतो.
योहान 17:14-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवलेस तसे मीही त्यांना जगात पाठवले, आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो.
योहान 17:14-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी त्यांना तुझा संदेश कळवला आहे. जगाने त्यांचा द्वेष केला कारण जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे, अशी मी विनंती करत नाही, तर तू त्यांचे दुष्टापासून संरक्षण करावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. सत्यात तू त्यांना तुझ्याकरता समर्पित करून घे. तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवलेस तसेच मी त्यांना जगात पाठवले आणि त्यांनीही तुझ्याकरता समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला तुझ्यापुढे समर्पित करतो.