योहान 17:14-15
योहान 17:14-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो.
योहान 17:14-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी त्यांना आपले वचन सांगितले आहे आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत. आपण त्यांना जगातून काढून घ्यावे यासाठी मी प्रार्थना करीत नाही, परंतु आपण त्यांचे दुष्टापासून रक्षण करावे.
योहान 17:14-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो.
योहान 17:14-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी त्यांना तुझा संदेश कळवला आहे. जगाने त्यांचा द्वेष केला कारण जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे, अशी मी विनंती करत नाही, तर तू त्यांचे दुष्टापासून संरक्षण करावे अशी विनंती करतो.